घरमहाराष्ट्रRamdas Kadam : भाजपाने विरोध केल्याने शिंदेंनी भास्कर जाधवांना घेणे टाळले, रामदास...

Ramdas Kadam : भाजपाने विरोध केल्याने शिंदेंनी भास्कर जाधवांना घेणे टाळले, रामदास कदमांचा दावा

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज (ता. 10 मार्च) कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 2019 चा किस्सा सांगत त्यांनी उद्धव ठाकरे जर भाजपासोबत गेले असते तर ते त्यांच्यासोबत गेले नसते, असे सांगितले. पण त्यांच्या या भूमिकेचे खंडन करत शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी वेगळाच दावा केला आहे. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भास्कर जाधव यांना सोबत घेण्यास नकार दिल्याचा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. (Eknath Shinde avoided taking Bhaskar Jadhav with him because of BJP opposition, claims Ramdas Kadam)

हेही वाचा… Bhaskar Jadhav : …तर मी तुमच्याबरोबर नसेल, भास्कर जाधवांनी सांगितला 2019चा किस्सा

- Advertisement -

आमदार भास्कर जाधव यांचा कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीने रामदास कदम यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भास्कर जाधव यांना त्यावेळी शिंदे गटात येण्याची इच्छा होती. पण शिवसेना नेतृत्त्वाने त्यांना सांगितले की, थोडे दिवस थांबा, आम्ही भाजपाची समजूत घालतो. पण भाजपाने नंतरही भास्कर जाधव यांच्या समावेशाला विरोध कायम ठेवला. त्यामुळेच भास्कर जाधव आता उद्धव ठाकरे यांना तुम्ही भाजपासोबत गेल्यास मी तुमच्यासोबत येणार नाहीत, असे म्हणत आहेत. उद्या उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र आले तरी भाजपा भास्कर जाधव यांना सोबत घेण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळेच उद्या उद्धव ठाकरे भाजपासोबत गेल्यास आपले काय होणार, ही भीती भास्कर जाधव यांना वाटत आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत जाऊ नका, अन्यथा मी सोबत नसेन, असे सांगत असल्याचे रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार सुरतमध्ये गेले होते. भास्कर जाधव हे गुजरातच्या सीमेपर्यंत येऊन माघारी फिरले होते. भास्कर जाधव हे सुरतच्या जवळ पोहोचले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला आमच्यासोबत घेता येणार नाही. भाजपाकडून तुम्हाला आमच्या गटात घेण्यास विरोध केला जात आहे. भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल आणि अधिवेशनावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील समावेशाला विरोध करण्यात आला, अशी माहिती माझ्याकडे असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता कदम यांच्या दाव्यावर भास्कर जाधव नेमके काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -