घरमहाराष्ट्रमहापालिका निवडणुकांआधीच शिंदे-फडणवीस सरकारनं भाकरी फिरवली, 104 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

महापालिका निवडणुकांआधीच शिंदे-फडणवीस सरकारनं भाकरी फिरवली, 104 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

अखेर सोमवारी या पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या महापालिकांच्या निवडणुका आहेत

मुंबई : राज्य पोलीस दलातील 104 पोलीस उपायुक्तांच्या सोमवारी गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बदल्या अपेक्षित होत्या. अखेर सोमवारी या पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच शिंदे फडणवीस सरकारनं भाकरी फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत, परंतु आता महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

इप्पर ज्ञानोबा यांची नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अनिल पारसकर, एम. राजकुमार, प्रवीण मुंढे, दीक्षितकुमार गेडाम, अकबर पठाण, पुरुषोत्तम कराड, मंगेश शिंदे, अजय बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, गौरव सिंग, अमोध गावकर यांची मुंबई शहर, ए. एच. चावरिया यांची पुणे गुन्हे शाखा, प्रणव अशोक यांची नवी मुंबई राज्य राखीव पोलीस दल समादेशक, मंजुनाथ सिंगे यांची पोलीस महासंचालक कार्यालय, राकेश कलासागर यांची अमरावती, प्रियांका नारनवरे यांची नागपूर, भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर, संदीप गिल्ल यांची पुणे, मुमक्का सुदर्शन यांची नागपूर, सुरेशकुमार मेंगळे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार, राजेश बनसोडे यांची पुणे, विश्वास पांढरे याची नागपूर, सुनीता साळुंखे, शीला शाईल, अशोक दुधे, सदानंद पाटील, वसंत जाधव यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, एस. एस बुरसे यांची ठाणे पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

सुनील कडासने यांची नागपूर, विश्वास पानसे यांवी नागपूर, स्मार्तना पाटील यांची पुणे, प्रशांत मोहिते यांची ठाणे, धोंडोंपत सामी यांची नागपूर, अमोल तांबे यांची पुणे, सुहेल शर्मा यांची पुणे, अनुराग जैन, गौरख भामरे याची नागपूर, प्रवीण पाटील यांची पुणे, नम्रता पाटील यांची मुंबई, संदीप डोईफोडे, अविनाश अंबुरे, सुहास बावचे यांची मिरा-भाईदर-वसई-विरार, यशवंत सोळंके यांची नागपूर, राहुल श्रीरामे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, भरत तांगडे यांची वाशिम, रुपाली खैरमोडे यांची ठाणे, दिपक देवराज यांची पुणे, सुनिल लोखंडे यांची नागपूर, किरणकुमार चव्हाण यांची नाशिक, प्रशांत खैर यांची अहमदनगर, पंकज डहाणे यांची नवी मुंबई, राहुल माकनिकर यांची नागपूर, गीता चव्हाण यांची नाशिक, संभामजी कदम यांची अमरावती, शिवराज पाटील यांची ठाणे शहर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

प्रशांत बच्छाव यांची नाशिक, शशिकांत बोराटे यांची पुणे, संदीप पखाले यांची नागपूर, अमित काळे यांची नवी मुंबई, दिपाली घाटे यांची ठाणे, प्रकाश गायकवाड यांची सोलापूर, संजयकुमार पाटील यांची नवी मुंबई, मिलिंद मोहिते यांची हिंगोली, तिरुपती काकडे यांची फोर्स वन, विजय खरात यांची पोलीस महासंचालक कार्यालय, योगेश चव्हाण यांची नवी मुंबई, मारुती जगताप यांची अमरावती, सागर पाटील यांची अमरावती, बापू बांगर यांची सातारा, गजानन राजमाने यांची फोर्स वन, आनंद मोईटे यांची पुणे बारामती, सचिन पांडकर यांची बीड अजय देवरे यांची लातूर, यशवंत काळे यांची परभणी, राहुल खाडे यांची अमरावती, खंडेराण धरणे यांची नांदेड, दीपक आप्पा धरणे यांची नांदेड, जयश्री जाधव यांची रत्नागिरी, दीपक गिर्‍हे यांची जालना, अभिजीत शिवथरे यांची जालना, विजय कबाडे यांची वर्धा, सुनील लांजेवार यांची औरंगाबाद, विक्रांत देशमुख यांची पुणे, जयश्री देसाई यांची कोल्हापूर, राजलक्ष्मी सतीश शिवणकर यांची पुणे, चंद्रकांत खांडवी यांची नाशिक, एम. एम. मकानदार यांची पुणे खंडाळा, धीरज पाटील यांची सांगली, निकेश खाटमोडे यांची कोल्हापूर, अमरजीत जाधव यांची ठाणे, स्वपना गोरे यांची यांची पिंपरी-चिंचवड, संदीप आटोळे यांची औरंगाबाद, शर्मिला घार्गे यांची नाशिक, अशोक थोरात यांचीं बुलढाणा, दिपाली काळे यांची सोलापूर, विजय मगर यांची पुणे आणि विवेक पाटील यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचाः …म्हणून आज बांधावरती जावं लागतंय, श्रीकांत शिंदेंचा नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -