घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे आता आदित्य यांना धक्का देण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे आता आदित्य यांना धक्का देण्याच्या तयारीत

Subscribe

शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हाही वरळीतील एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता शिंदे गटात गेला नव्हता. यासर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वरळीकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसते

मुंबई : विधासभेतील शिवसेनेचे ३९ आमदार आपल्यासोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका दिल्यानंतर आता शिंदे यांनी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. आदित्य ठाकरे विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी मतदारसंघातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे येत्या काही दिवसात वरळीतील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅनरबाजीही नुकतीच पाहायला मिळाली. वरळी हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आणि बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हाही वरळीतील एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता शिंदे गटात गेला नव्हता. यासर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वरळीकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसते.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरळी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकल्याचे पहायला मिळाले. वरळीचा श्रीविघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजाच्या स्वागत कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. इतकेच नाही तर त्यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असेही लिहिण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर  गुरूवारी शिंदे यांची वरळी मतदारसंघातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचे समजते. शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून त्यांच्या  प्रवेशाबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याचेही समजते. प्रत्यक्षात किती आणि कोणते पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, महत्वाचे पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत गेल्यास वरळीत  शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचाः राज्यात 1 हजार 258 नव्या रुग्णांची नोंद; 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -