घरताज्या घडामोडीधाराशिवमध्ये मविआला मोठा धक्का, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत 25-30 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

धाराशिवमध्ये मविआला मोठा धक्का, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत 25-30 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. मात्र, या सभेच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव येथील 12 नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उप नगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव मधील काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, सौ. सुवर्णा सागर मुंडे, सौ. आशा सुधीर भवर यांच्यासह अमर विजय गायकवाड, सुभाष सुर्यभान पवार, इंदुमती हौसलमल, साधना कांतीलाल बागरेचा, गीता महेश पुरी, सफुरा शकील काझी या माजी उपनगराध्यक्ष यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण मनोहर कापसे ( माजी गटनेता ), सुधीर मुरलीधर भवर (सरचिटणीस कळंब शहर ) महेश मिठू पुरी ( कार्याध्यक्ष ), उत्रेश्वर बळीराम चोंदे ( उपाध्यक्ष ), माजी नगरसेवक मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, कांतीलाल मोहनलाल बागरेचा यांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कळंब नगरपालिकेवर फडकेल, असा विश्वास कळंबचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक, महापालिका आयुक्तांचे आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -