घरमहाराष्ट्रगणेशोत्सवातही राजकीय कुरघोडी सुरूच; बाप्पाच्या मिरवणुकीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांची शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी

गणेशोत्सवातही राजकीय कुरघोडी सुरूच; बाप्पाच्या मिरवणुकीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांची शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी

Subscribe

''50 खोके एकदम ओके'' अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या. या कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन सुरु होते. पावसाळी अधिवेशनावेळी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवीरुद्ध घोषणाबाजी केली. शिंदे गटात(cm eknath shinde) गेलेल्या आमदारांविरुद्ध टीका सुद्धा करण्यात आली. दरम्यान युवासेनेच्या पधाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवातही शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याची संधी सोडली नाही. गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने ”50 खोके एकदम ओके” असं लिहिलेलं टी – शर्ट परीक्षण केले होते.

हे ही वाचा – देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? शिवसेनेचे भाजपावर शरसंधान

- Advertisement -

युवासेनेचे(yuvasena) विभागीय सचिव आणि युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया हे आहेत. युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने जळगावातील काव्य रत्नावली चौकात सार्वजनिक गणेश मूर्तींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याच निमित्ताने शहरात बाप्पाची आगमन मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. यामध्ये युवाशक्तीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हे ही वाचा – शरद पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रम झाला तर…, महाविकास आघाडीबाबत सूचक वक्तव्य

- Advertisement -

यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने ”50 खोके एकदम ओके” असं लिहिलेले टी- शर्ट परीधान केले होते. गणपती बापा मोरया सोबतच ”50 खोके एकदम ओके” अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या. या कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधले. गणेशोत्सव काळात म्हणजे 10 दिवस हे टी- शर्ट सर्व कार्यकर्ते परिधान करणार आहेत. याद्वारे सुवसेनेन शिंदे गटातील(sm shinde shinde) आमदारांवर चांगलाच निशाणा साधला आहे. गणेशोत्सव काळात सुद्धा राजकीय कुरघोडी सुरूच आहेत.

हे ही वाचा – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील विदर्भासाठी मनसेचा मास्टर प्लॅन

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -