घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबागलाण तालुक्यात बोगस खत आढळल्याने खळबळ

बागलाण तालुक्यात बोगस खत आढळल्याने खळबळ

Subscribe

सटाणा : सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची पूर्वतयारीची लगबग सुरू असताना कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या दोन कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने नाशिक प्रयोगशाळेतून आलेल्या आवाहलानुसार अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळेच बोगस रासायनिक खतांच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अप्रमाणित आढळून आलेली खते खरेदी न करण्याचे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी केले आहे.

सटाणा तालुक्यातील मालेगाव रोड परिसरातील मे. सचिन एजन्सीज या दुकानातून 6 ऑक्टोबर २०२२ रोजी किसान शक्ती फर्टिलायझर अ‍ॅड पेस्टिसाईडस प्रा.लि. जिआडीसी सायखा (ता.वागरा जि.भरूच) उत्पादित झिंकेटेड बोरोनेटेड सिंगल सुपर फॉस्फेट हा खत नमुना व मे द्वारका ग्रो ताहाराबाद येथून 13 ऑक्टोबर २०२२ रोजी गोल्डन अपॉर्टूनिटी शॉप नं 3 लोवर ग्राऊंड प्लॉर स्टार झोन मॉल, पुणे-नाशिक हायवे, नाशिक उत्पादित ऑरगॅनिक मॅन्यूर (सेंद्रिय खते) बागलाण पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी रासायनिक खते विश्लेषण प्रयोगशाळा नाशिक येथे तपासणी कामी सादर केलेला होता. त्यात किसान फर्टिलायझर ड पेस्टिसाईडस प्रा.लि जिआडीसी वागरा (भरूज) कंपनी निर्मिती झिंकेटेड बोरोनेटेड सुपर फॉस्फेट खत नमुन्यात वॉटर सोल्युबल फॉस्फेट या घटकांत अप्रमाणित घोषित करण्यात आला आहे. गोल्डन अपॉर्टूनिटी स्टार झोन मॉल नाशिक कंपनीचे उत्पादित ऑरगॅनिक मॅन्यूर (सेंद्रिय खते ) नमूना अप्रमाणित घोषित करण्यात आला आहे. हे खते खरेदी न करण्याबाबत कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

शासनाकडून या बोगस खते विक्री करणार्‍या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी बळीराजांकडून करण्यात आली आहे. दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात नेहमीच काही कंपन्या अप्रमाणित खते मार्केट मध्ये आणून आपले उखळ पांढरे करून घेतात. निसर्गाचा लहरीपणा, पिकांच्या भावातील चढउतार, आर्थिक चणचण हे सर्व सहन करत बळीराजांकडून आपल्या काळया आईच्या कुशीत दाणा टाकून उदयाचे हिरवे स्वप्न रंगवत असतो यातच पेरणी हंगामात नेहमीच खतांची कृत्रिम टंचाईचे षड्यंत्र रासायनिक खते विक्रेते व कंपन्यांकडून केले जाते. त्यामुळेच दरवर्षीचा अनूभव पाहता बळीराजांकडून लवकरात लवकर खते खरेदीवर भर दिला जातो. या घाईगडबडीत बर्‍याचदा अप्रमाणित खते ही बळीराजांच्या माथी मारली जात असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. चालू हंगामात कृषी विभागाकडून वेळीच कारवाई झाल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान टळले आहे. या कंपनीवर कारवाई करून ज्या शेतकर्‍यांकडून ही खते खरेदी झाली असतील, त्यांना त्यांचा परतावा मिळून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

कृषी विभागाकडून अप्रमाणित करण्यात आलेली कंपनीचे खते खरेदी करू नये. खते, बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांनी अधिकृत दुकानदारांकडून खरेदी करून पक्के बिल घ्यावे. संशयित कंपनीची खते कोणीही विक्री करू नये. : सुधाकर पवार, तालूका कृषी अधिकारी, कृषी विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -