घरक्राइमइंदिरानगर पोलीस ठाणेच असुरक्षित; अनेक दिवसापासून सीसीटीव्ही बंद

इंदिरानगर पोलीस ठाणेच असुरक्षित; अनेक दिवसापासून सीसीटीव्ही बंद

Subscribe

इंदिरानगर : शासकीय कार्यालयात कामकाजासाठी ये-जा करणार्‍यांसह कार्यालयाच्या सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांशी शासकीय कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असतात. हे कॅमेरे चालू आहेत की बंद आहे, याबाबतची माहिती संबंधित कार्यालयातील प्रमुख आधिकार्‍यांना ज्ञात असणे आवश्यक आहे. मात्र, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असूनही याबाबत संबंधित अधिकारी अनभिज्ञ आहेत.

नाशिक आयुक्त हद्दीतील सर्व शासकीय कार्यालयांसह सर्वच पोलीस ठाण्याबाहेर शासनाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कार्यालयात कामकाजासाठी येणार्‍या जाणार्‍यांसह अभ्यांगतावर निगराणी ठेवण्याचे काम यामाध्यमातून होत असते. त्यात बरोबर कार्यालयात होणार्‍या कामकाजावर देखील याच माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जाते. तसेच कार्यालयात चोरीमारीसह काही वादविवाद झाल्यास पुरावा म्हणून याच कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून पुराव्यासाठी फुटेज घेतले जाते. इतके महत्त्वाचे काम करणारा सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे की बंद याबाबतची माहिती संबंधित कार्यालयातील प्रमुखांना ज्ञात असणे गरजेचे आहे. मात्र, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहेत. पोलीस ठाण्याच्या बाहेर ३६० डिग्रीत फिरुन आजूबाजूचे चित्रण या कॅमेराच्या केले जाते. मात्र, हा कॅमेरा नादुरुस्त झाल्याने एकाच ठिकाणी थांबला आहे. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरातील चित्रण बंद पडले आहे. भविष्यात एखादी घटना-दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा नादुरुस्त झाल्याची माहिती मिळाली असून, कॅमेराच्या देखभाल दुरुस्ती करणार्‍या एजन्सीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. विशेष म्हणजे खासगी एजन्सीकडून काम करताना मोठी अडचण निर्माण होत असल्याने अधिकृत एजन्सीच्या भरवशावर सध्या थांबावे लागणार आहे. : संजय बांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -