घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रExlusive : 'त्या' आधाराश्रमात इतरही ८ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती

Exlusive : ‘त्या’ आधाराश्रमात इतरही ८ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती

Subscribe

नाशिक : म्हसरूळ शिवारातील रासबिहारी-मेरी लिंक रोडवरील ज्ञानदीप गुरुकुल आधारआश्रमात एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकाने मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखीवून बलात्कार केल्याची बाब गुरुवारी (दि. २४) उघडकीस आल्यानंतर याच आश्रमातील तब्बल आठ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक तितकीच गंभीर बाब ‘आपलं महानगर’च्या शहानिशेतून पुढे आली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत मुलींची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे. जिल्हा रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे.

रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर मधील एका इमारतीत चार वर्षांपासून किंग फाऊंडेशनतर्फे ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रम चालविला जातो. विशेष म्हणजे, या इमारतीबाहेर आधाराश्रमाचे बोर्ड नसल्याचे दिसून आले. या आश्रमात जवळपास सुमारे ३५ मुले-मुली आहेत. या संस्थेचा कारभार संशयित आरोपी संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२, मूळ रा. सटाणा) हा बघतो.

- Advertisement -

त्याने २२ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेदरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्याने तिला हात व पाय दाबून देण्याच्या बहाण्याने सांगितले. त्यानंतर त्याने अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने नकार दिला असता त्याने तिला होस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी पीडित मुलीने फिर्याद देताच संशयित आरोपीला अटक केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या म्हसरूळ पोलीस करत आहेत.

ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींनी संशयित आरोपी हर्षल मोरे याने लैंगिक शोषण केल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, जिल्हा रुग्णालयाकडून लवकर वैद्यकीय अहवाल मिळावा, यासंदर्भात आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास केला सुरु आहे. : दीपाली खन्ना, तपास अधिकारी, एसीपी

ज्ञानदीप आधार आश्रमातील मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी पत्रव्यवहार केला. त्यानुसार शुक्रवारी (दि.२५) आधार आश्रमातील मुलींची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीत तपासणीचे काम चालू होते. शनिवारी (दि.२६) सर्व वैद्यकीय अहवाल तयार होतील. त्यानंतर ते पोलिसांना लगेच दिले जातील. : डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -