घरताज्या घडामोडीपुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी

पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी

Subscribe

पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पुण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात येताना दिसत आहे. यावेळी पुण्यात शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केलाय. पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांदेरे यांची शिवसेनेतून (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

पक्ष सोडण्याचं कारण काय?

- Advertisement -

बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गट सोडण्याचं कारण सांगितलं आहे. महाविकास आघाडीत काम करत असताना घुसमट होत होती. पाहिजे तसा वाव मिळत नव्हता. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचं काम करू, असं बाळासाहेब चांदेरे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब चांदेरे यांनी पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात ठाकरे गटाचं मोठं काम केलं आहे. या तीन तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाला या तीन तालुक्यात पाय रोवण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा : १५ मे पर्यंत ‘घर चलो अभियान’ राबवणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -