घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समिती निवडणूक : मनमाडमध्ये ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

बाजार समिती निवडणूक : मनमाडमध्ये ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Subscribe

नाशिक : मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२०) माघारीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून ठाकरे गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाणदेखील केली. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व पोलिसांसमोर सुमारे अर्धा तास हा राडा सुरू होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, तणाव कायम होता. या घटनेमुळे बाजार समिती निवडणुकीला गालबोट लागले.

मनमाड बाजारसमितीच्या 18 जागासाठी 30 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना, भाजप युती अशी लढत होत आहे. युतीचे नेतृत्व आमदार सुहास कांदे, साईनाथ गिडगे, डॉ. संजय सांगळे, प्रकाश घुगे आदींकडे आहे. तर, महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी आमदार संजय पवार व ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, दीपक गोगड करत आहेत. 18 जागांसाठी तब्बल 150 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते.

- Advertisement -

गुरुवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समिती आवारात गर्दी केली होती. दुपारी एक वाजेदरम्यान एका उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्याच्या कारणावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी केलेली मध्यस्थी व पोलिसांचा हस्तक्षेप यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -