घरमहाराष्ट्रआयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Subscribe

सरकारकडून कौशल्य विकास आधारित शिक्षणाच भर देण्यात येत आहे. मात्र यंदा गतवर्षीच्या तुलनेत आयटीआय प्रवेशाचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अनेक भागांमध्ये लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी असल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

२ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांची  नोंदणी

राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून १ लाख ४५ हजार ६३२ जागांसाठी  ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ही मुदत २१ ऑगस्टला संपणार होती. मात्र प्रवेश प्रक्रियेदरम्यान १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असून, त्यापैकी २ लाख ७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरले नाहीत. प्रवेश अर्ज मोबाईलद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असली तरी दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेट समस्या असल्याने त्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. तसेच काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. तसेच काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisement -

प्रवेश प्रोत्साहन अभियान

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होण्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र भरवण्याबरोबरच दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली.

- Advertisement -

अर्ज भरताना अडचणी आल्यास

विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -