घरताज्या घडामोडीपोलीस वसाहतीबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आयुक्तांसोबत चर्चा करुन मार्ग काढू, फडणवीस यांचे आश्वासन

पोलीस वसाहतीबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आयुक्तांसोबत चर्चा करुन मार्ग काढू, फडणवीस यांचे आश्वासन

Subscribe

तुमच्या भावना आणि अपेक्षा या तिथपर्यंत पोहचवून मार्ग काढायचा या एकमेव हेतूने आलो आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव नवीन पोलिस वसाहत येथील पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी फडणवीसांनी नागरिकांना आश्वासन देताना म्हटलं आहे की, इमारत जर दुरुस्ती करण्यासारखी असेल तर कोरोनाच्या काळात अशा प्रकारे बाहेर काढणं योग्य होईल असे मला वाटत नाही. हा कोणाच्या विरोधातील आक्रोश नाही तर एक प्रकारे आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी एकत्र आलो आहेत. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आणि आयुक्तांसोबत चर्चा करुन यातून मार्ग काढण्याचा प्रय्तन करु असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

निर्णयाला स्थगिती देण्यात यावी

पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, तुमच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये सेतू निर्माण करायचा, तुमच्या भावना आणि अपेक्षा या तिथपर्यंत पोहचवून मार्ग काढायचा या एकमेव हेतूने आलो आहे. कोरोनाच्या काळात शिफ्टिंग हे शक्य नाही. मला सांगण्यात आले की, शिफ्टिंगसाठी देण्यात आलेल्या जागा या जागेपेक्षा खराब आहेत. मग या शिफ्टिंगचा अर्थ काय आहे. जर ही जागा वाईट सांगत असून यापेक्षा वाईट ठिकाणी शिफ्टिंग करण्यात येत असेल तर चुकीचे होत असल्याचा माझा समज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, पहिल्यांदा या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी तसेच काही दुरुस्तीचे काम असेल तर तसे त्यांनी करावे अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

बीडीडी चाळीतील पोलिसांकरता विशेष निर्णय

दरम्यान फडणवीस यांनी बीडीडी चाळीसंदर्भात भाष्य केलंय की, बीडीडी चाळींच्या संदर्भात आमचे सरकार असताना आम्ही निर्णय केला आहे. तो निर्णय करताना पहिल्यांदा पोलिसांकरता विशेष निर्णय करुन त्यांना इकडे तिकडे जाऊ नये यासाठी या दृष्टीने उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने एफिडेव्हिट दाखल करुन पोलिसांना संरक्षण दिले आहे. मी स्वतः लक्ष घालून योजना केल्या आणि टेंडर काढून काम करण्याचे आदेश दिले होते. ते करताना पहिल्यांदा मोकळ्या जागेवर इमारती तयार करायच्या आणि लोकांना तिकडे शिफ्ट करायचा आणि नंतर जुन्या इमारती तोडायचा असा निर्णय केला होता असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नायगावच्या भागात अशा प्रकारची मोकळी जागा उपलब्ध आहे. मागच्या काळात एक प्रस्ताव मांडला होता आणि मुख्यालयाचा भाग आहे. तिकडे नव्याने बांधकाम करुन पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना घरं असा प्रस्ताव मांडला होता. सरकार गेल्यामुळे तो प्रस्ताव पुर्ण झाला नाही. याचा पाठपुरावा केला तर बऱ्याच समस्या सुटतील पण वसाहतीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून मार्ग काढू असा दिलास फडणवीस यांनी दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -