घरदेश-विदेशगरीब-श्रीमंत देशांतील लसीकरणाची विसंगती! कोविड लसींच्या बूस्टर डोसवर WHO कडून स्थगितीची मागणी

गरीब-श्रीमंत देशांतील लसीकरणाची विसंगती! कोविड लसींच्या बूस्टर डोसवर WHO कडून स्थगितीची मागणी

Subscribe

जागतिक आरोग्य संघचना म्हणजेच डब्ल्यूएचओने गरीब आणि श्रीमंत देशांमधील लसीकरणातील विसंगतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ही चिंता व्यक्त करताना जागतिक आरोग्य संघटनेने किमान सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोविड -19 लसींच्या बूस्टर डोसवर स्थगितीची मागणी केली आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि असे सांगितले की, श्रीमंत देशांमध्ये आतापर्यंत लसीचे साधारण १०० कोरोनाचे डोस दिले गेले आहेत, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीच्या पुरवठ्याअभावी प्रति १०० लोकांमध्ये फक्त १.५ कोरोना डोस देण्यात आले आहेत.

श्रीमंत किंवा जास्त प्रमाणावर उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लस पाठविण्याची परवानगी देण्याचे धोरण तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार, डब्ल्यूएचओ कमीतकमी सप्टेंबर अखेरपर्यंत बूस्टर स्थगित करण्याची मागणी करत आहे, जेणेकरून कमीतकमी १० टक्के लोकसंख्येला लसीकरण केले जाईल, असे गेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. विज्ञानाने अद्याप हे सिद्ध केले नाही की ज्यांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांना बूस्टर डोस देणे गरजेचे आहे किंवा नाही. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यात बूस्टर डोस प्रभावी आहे की नाही, असे देखील डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डब्ल्यूएचओने श्रीमंत देशांना विकसनशील देशांमध्ये लसींचा होणारा तुटवडा टाळण्यासाठी अधिक पावले उचलण्याचे वारंवार आवाहन केले आहे.

- Advertisement -

बूस्टर डोस म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट बॅक्टेरिया अथवा व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असते. हा बूस्टर डोस त्याच लशीचा असू शकतो जी लस आधीच एखाद्या व्यक्तीने घेतली आहे. बूस्टर डोस शरीरात अधिक एँटीबॉडीज निर्माण करत प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करतो. सध्या जगात ज्या लशींचे दोन डोस रुग्णांना दिले जात आहेत. त्यांना प्राइम डोस म्हणतात. त्यानंतर एका वर्षात किंवा त्यानंतर कधीही लशीचा आणखी एक डोस घ्यावा लागला तर त्याला बूस्टर डोस म्हणता येईल.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -