उधार राजाचे जाहीर आभार

विरोधी पक्षनेते फडणवीसांची टीका

Opposition leader Devendra Fadnavis
फडणवीस यांचा टोला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भातील दौर्‍यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासह इतर प्रकल्पांच्या केलेल्या पाहणीनंतर फडणवीस यांनी ‘उधार राजाचे जाहीर आभार’, असे ट्विट करत बोचरी टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिवेशन वगळता 14 महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा आहे. या दौर्‍यापूर्वी कालच शेतकर्‍यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला आहे.

पूर्व विदर्भातील 6जिल्ह्यांतील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली, असे सांगत फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. विदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणे स्वागतार्ह आहे. केवळ फक्त दौरा करुन चालणार नाही, गोसीखुर्दसहित विदर्भाच्या विकासासाठी निधी दिला पाहिजे.