घरमहाराष्ट्रदुष्काळाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

दुष्काळाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Subscribe

दुष्काळ आणि कर्जाला कंटाळून आंधळगांव पाटकळ रोडवर असलेल्या रस्त्याजवळ मंगळवेढा येथील भारत आप्पा गडदे (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील आत्महत्येची ही चौथी घटना आहे. यापूर्वी निंबोणी येथील दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर पडोळकरवाडी येथील एकाने गेल्या आठवड्यापूर्वीच आत्महत्या केली़. मंगळवेढा तालुक्यात शेतक-यांमध्ये आत्महत्या करण्याचे लोन वाढत आहे. याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. आत्महत्याग्रस्त भारत गडदे यांची पाठखळ येथे शेती आहे़. मागील दोन ते तीन वर्षापासून या भागात दुष्काळ पडत आहे़. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़. त्यामुळे बँकेतून काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत.़ शिवाय जनावरांना चारा नाही, पाण्याअभावी पिके जळून गेली़. पुढील दहा महिने कसे काढायचे या विवंचनेतून भारत गडदे या शेतक-याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -