स्थानिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दोन महिला पंच

भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये मुलांच्या सामन्यात दोन महिला पंच असण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

वृन्दा राठी
मागील काही वर्षांत भारताच्या महिला क्रिकेट संघाने झपाट्याने प्रगती केली आहे. आता भारताच्या महिला पंचही मागे नाहीत. बुधवारी सीके नायडू चषकात मणिपूर आणि मिझोराम यांच्यातील सामन्यात मुंबईच्या वृन्दा राठी आणि चेन्नईच्या एन जननी या दोघी पंच म्हणून काम पाहतील. भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये मुलांच्या सामन्यात दोन महिला पंच असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेटसाठी १३ महिला मॅच रेफ्री

वृन्दा राठी आणि एन जननी या दोनच अशा महिला पंच आहेत ज्यांनी बीसीसीआयची ‘लेवल २’ ही परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा पास करणाऱ्या पंचांना महिला क्रिकेट आणि ज्युनियर मुलांच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहता येते. बीसीसीआयने यावर्षी महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेटसाठी १३ महिला मॅच रेफ्रीची निवड केली आहे. वृन्दा या मागील काही वर्षे स्कोरर म्हणून काम करत होत्या.