घरमहाराष्ट्रपुणेयेरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान राडा, हवालदारावरही हल्ला

येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान राडा, हवालदारावरही हल्ला

Subscribe

पुणे – येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हाणामारी सोडवायला गेलेल्या हवालदारालाही या कैद्यांनी मारहाण केली. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचायुवकांनी सुरु केली ‘बिबट सफारी’; जुन्नर तालुक्यातील प्रयोग

- Advertisement -

येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट सातजवळ असलेल्या २७ ते ३१ बॅरेट नंबर गेटजवळ कैद्यांनी हाणामारी झाली. शिवीगाळ करण्यावरून हे प्रकरण चिघळलं. यानंतर वाद वाढला आणि कैद्यांच्या दोन गटांनी एकमेकांच्या दिशेने फरशीचे तुकडे आणि दगड भिरकावले. यावेळी पोलीस कर्मचारी हनुमंत मोरे मध्यस्थी करायला गेले होते. परंतु, कैद्यांनी त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांना रुग्णलायात दाखल केले आहे.

महाराष्ट्रसह देशातील अनेक ठिकाणांचे कुख्यात गुन्हेगार येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून नेहमीच खबरदारी घेण्यात येत असते. परंतु आज सकाळी अचानक येरवडा जेलमध्ये झालेल्या या तुफान हाणामारी आणि दगडफेकीच्या घटनेत काही कैदी जखमी झाल्याचं बोललं जात आहे. याशिवाय या घटनेनंतर संपूर्ण कारागृहात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता कारागृह प्रशासनानं स्थिती नियंत्रणात आणली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -