घरमहाराष्ट्रऐकावे ते नवलच; सिगारेटवरून झाली हाणामारी, ५ गंभीर जखमी

ऐकावे ते नवलच; सिगारेटवरून झाली हाणामारी, ५ गंभीर जखमी

Subscribe

सिगारेटवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर प्रचंड हाणामारीत झाल्याची घटना खालापूर हद्दीतील उंबरे गाव येथे शुक्रवारी रात्री घडली असून, हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार पोलिसांत दिली आहे. फिर्यादी सागर दादाराम जाधव (२३, वडगाव, मावळ) याने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी तो मित्रांसोबत मामाच्या गावाला रोहे येथे कारने निघाला होता. त्याच्यासोबत प्रशांत मोहिते, अक्षय रिटे व रवींद्र मोहिते होते. खोपोली-पाली मार्गाने जात असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उंबरे गावानजीक सिद्धीविनायक हॉटेल येथे सागर आणि त्याचे मित्र सिगारेट घेण्यासाठी थांबले. सिगारेट घेतल्यानंतर सागरने एटीएम कार्ड दिल्यामुळे वादाला सुरूवात झाली.

वाद वाढत जाऊन शिवीगाळ आणि हॉटेलमधील कामगारांनी लाथाबुक्क्यांनी, स्टम्प आणि फावड्याच्या दांड्यांनी मारहाण केली, असे सागर याने तक्रारीत म्हटले आहे. तसेच हॉटेल मालकाने फोन करून आणखी दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. त्यांनीसुद्धा जबर मारहाण करीत कारच्या काचा फोडल्या. मारहाणी दरम्यान अक्षय रिटे आणि रवींद्र मोहिते यांनी पळ काढला, परंतु प्रशांत मोहिते याच्या हाताला जबर दुखापत झाली.

- Advertisement -

सागर जाधव ने हॉटेलमधील कामगारासंह दहा ते पंधरा अनोळखी इसमांविरोधात तक्रार दिली आहे. तर चंद्रशेखर शरनाप्पा निंबरगी (६०, रा.सोलापूर) याने दिलेल्या तक्रारीनुसार हे हॉटेल त्यांनी चालविण्यास घेतले असून, शुक्रवारी रात्री चार तरुण मद्यधुंद अवस्थेत सिगारेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी चंद्रशेखर यांचा मुलगा आनंद याने सिगारेट नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या तरुणांनी शिविगाळ करीत आनंद याला मारहाण करण्यास सुरूवात केली. आनंदला होत असलेली मारहाण पाहून हॉटेलमधील चार कामगार मध्यस्थी करण्यास गेले असताना वाद घालणार्‍या एका तरुणाने बाटलीची फुटलेली काच सोनू नावाच्या कामगाराच्या पोटात खुपसल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. भांडण करणारे चारपैकी दोघेजण कार घेऊन पळून जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाल्यामुळे ते सापडले, तर दोघांना हॉटेलमधील कामगारानी पकडून ठेवले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -