घरमहाराष्ट्रमुंबईत कोविड 19 XE व्हेरिएंटचा रुग्ण नाहीच, महापालिकेचा दावा केंद्रानं फेटाळला

मुंबईत कोविड 19 XE व्हेरिएंटचा रुग्ण नाहीच, महापालिकेचा दावा केंद्रानं फेटाळला

Subscribe

मुंबईतील एका ५० वर्षीय महिलेला 'एक्सई'ची बाधा झाल्याचं प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळले असून, ही महिला दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे. चित्रिकरणासाठी १० फेब्रुवारीला ती भारतात आली होती. चित्रीकरणादरम्यान नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता तिला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचे आढळले. ३ मार्चला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला कोरोनामुक्त झाल्याचंही आढळलं.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सरकारनं मुंबईला निर्बंध आणि मास्क मुक्त केलं. मात्र मुंबईत कोरोनाच्या ‘एक्सई’ नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागानं बुधवारी जाहीर केलं. एका ५० वर्षीय महिलेला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचं प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळले. त्यानंतर मुंबई पालिकेच्या कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत जनुकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा रुग्ण ‘एक्सई’बाधित आढळल्याचा दावा पालिकेनं केला. मात्र, पालिकेचा हा दावा केंद्रानं फेटाळाला आहे. तसंच, अधिक तपासासाठी त्याचे जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठविण्याचे आदेश कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला दिले.

इंडियन सार्स-सीओव्ही२ जिनोमिक्स कन्सॉर्रिटयम (आयएनएसएसीओजी) या संस्थेतील तज्ज्ञांच्या मते, या रुग्णाचे जिनोम चाचणीचा अहवाल एक्सईच्या जिनोमनुसार नाहीत. त्यामुळे या रुग्णाला एक्सई या उपप्रकाराची बाधा झाली आहे असं नाही. ‘आयएनएसएसीओजी’ची संध्याकाळी बैठक झाली असून, यामध्ये कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री सहभागी झाल्या होत्या. कस्तुरबा प्रयोगशाळेतील अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी नमुने पुन्हा पाठविण्याची मागणी या बैठकीत केली आहे. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्राथमिक तपासणीनंतर हे अहवाल जागतिक पातळीवरील जनुकीय चाचण्यांचा अभ्यास करणाऱ्या ‘जीआयएसएआयडी’ या संस्थेलाही पाठविले होते. या संस्थेनेही या रुग्णाला ‘एक्सई’ आढळल्याचे निश्चित केले आहे. तरी खात्री करण्यासाठी ‘आयएनएसएसीओजी’च्या मागणीनुसार हे अहवाल पुन्हा त्यांना पाठविले जाणार आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मुंबईतील एका ५० वर्षीय महिलेला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचं प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळले असून, ही महिला दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे. चित्रिकरणासाठी १० फेब्रुवारीला ती भारतात आली होती. चित्रीकरणादरम्यान नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता तिला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचे आढळले. ३ मार्चला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला कोरोनामुक्त झाल्याचंही आढळलं.

‘एक्सई’ म्हणजे काय?

- Advertisement -

एक्सई हा कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकाराचा उपप्रकार आहे. ओमायक्रॉनच्या बीए.१ आणि बीए.२ या उपप्रकारांचे उत्परिवर्तन होऊन एक्सई हा विषाणू निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ जनुकीय घटकांचे मिश्रण झाल्याचे आढळले आहे. ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार १९ जानेवारी २०२२ रोजी आढळला होता. जगभरात या विषाणूचे सहाशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आत्तापर्यत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारामध्ये हा सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे.


हेही वाचा – मुंबईतील नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -