घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचढया दाराचे आणि कामिशनचे आमिष दाखवून पुन्हा लाखोंचे द्राक्ष घेऊन परप्रांतीय व्यापारी...

चढया दाराचे आणि कामिशनचे आमिष दाखवून पुन्हा लाखोंचे द्राक्ष घेऊन परप्रांतीय व्यापारी फरार

Subscribe

नाशिक : द्राक्ष खरेदीचे कमिशन देण्याचे आमिष दाखवून व्हेजीटेबल कंपनीला दोन व्यापार्‍यांनी तब्बल 88 लाख 58 हजार 854 रुपयांची द्राक्षे खरेदी करुन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन परप्रांतीय व्यापार्‍यांविरोधात वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजपाल सिंह कुशवाह ऊर्फ राहुलभाई (रा. पश्चिम दिल्ली) व आशिष मिस्रा (रा. मंडी दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेदुमाला (ता. दिंडोरी) येथील विकास हिरामन घुगे यांची वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरी फाटा मार्केट येथे वक्रतुंड व्हेजीटेबल कंपनी आहे. त्यांची संशयित दोन परप्रांतीय व्यापार्‍यांशी ओळख झाली. दोघांनी संगनमत करुन घुगे यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी घुगे यांना द्राक्ष व्यापारी असल्याचे भासविले. घुगे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत द्राक्षे दिली. मात्र, दोघांनी त्यांचा विश्वासघात केला. याप्रकरणी घुगे यांनी दोन परप्रांतीय व्यापार्‍यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

- Advertisement -
शेतकर्‍यांकडून द्राक्ष खरेदी केल्यानंतर कमिशन देण्याचे दिले दोघांनी आमिष

शेतकर्‍यांकडून द्राक्ष खरेदी करा व ते द्राक्ष आम्ही खरेदी करु व त्याबदल्यात कमिशन देवू असे आमिष दोघांनी घुगे यांना दाखविले. त्या अमिषाला घुगे बळी पडले. माळेदुमाला शिवार व परिसरातून 4 हजार 894 क्विंटल 67 किलो द्राक्षे शेतकर्‍यांकडून खरेदी केली. घुगे यांनी 88 लाख ,58 हजार 854 रुपयांची द्राक्षे दोघांना विक्री केली. त्यानंतर घुगे यांनी दोघांशी संपर्क साधला असता कोणताही संपर्क झाला नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे घुगे यांच्या लक्षात आले.

कमिशनच्या हव्यासापोटी द्राक्षही गेली अन्…

ज्या शेतकर्‍यानी घुगेंवर विश्वास ठेवून द्राक्षे विक्री केली. ते शेतकरी घुगे यांच्याकडे रकमेसाठी तगादा करु लागले आहेत. कमिशनच्या हव्यासापोटी द्राक्षही गेली आणि कमिशनही गेले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आणि शेतकर्‍यांनी विचारणा सुरु केल्याचे घुगे यांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली.

- Advertisement -
पोलिसांचे आवाहन

 फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात द्राक्ष उत्पादन शेतकर्‍यांनी तक्रारी कराव्यात. व्यवहार करण्यापूर्वी व्यापार्‍याचा पत्ता, आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांकाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन हरसूल पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -