घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलीस भरती : लेखी परीक्षेत गणिताच्या प्रश्नाने फोडला घाम; ८४७ जणांची परीक्षेला...

पोलीस भरती : लेखी परीक्षेत गणिताच्या प्रश्नाने फोडला घाम; ८४७ जणांची परीक्षेला दांडी

Subscribe

नाशिक : ग्रामीण पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी रविवारी (दि.२) सकाळी केटीएचएम महाविद्यालयात १ हजार ३२ उमेदवारांनी हजेरी लावेली. तर ८४७ जणांनी दांडी मारली. लेखी परीक्षेत गणिताचे प्रश्न अवघड गेल्याने काही उमेदवारांनी सांगितले. सकाळी 6.30 वाजेपासून नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडला नाही. परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकालाकडे लक्ष आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या रिक्त १६४ पोलीस शिपाईपदांसाठी २ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ५० टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती. त्यांची रविवारी (दि.२) सकाळी 10 वाजता लेखी परीक्षा घेण्यात आली. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर सरकारवाडा पोलीस, परीक्षा व्यवस्थापनासाठी ग्रामीण पोलीस कार्यरत होते. १ हजार ८७९ पैकी ८४७ उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षा असल्याने ज्या जिल्ह्यात अधिक गुण आहेत, त्या ठिकाणी उमेदवारांनी हजेरी लावल्याने ८४७ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

लेखी परीक्षेला बुद्धीमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, मराठीसह विविध विषयांवर पर्यायी स्वरुपात शंभर प्रश्न विचारण्यात आले. उमेदवारांची ‘बायोमेट्रिक’द्वारे ओळख पडताळणी केल्यानंतर परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. सकाळी 1१.30 वाजता लेखी परीक्षा संपली. परीक्षा आवारात दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता. पोलीस भरती मैदानी परीक्षेच्या निकालात पहिल्या २९ उमेदवारांना ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. हे सर्व माजी सैनिक आहेत. सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा कट ऑफ ४३ गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा ४२, महिला ४०, प्रकल्पग्रस्त ३६, अनाथ ३०, खेळाडू २९, भूकंपग्रस्त २६ आणि पोलीस पाल्य २५ या गुणांचा कट ऑफ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा कट ऑफ अधिक राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -