घरमहाराष्ट्रविदेशी तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

विदेशी तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

Subscribe

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने घृणास्पद कृत्य

बलात्काराच्या घटनांनी देश हादरला असताना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पुण्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत युगांडातील २६ वर्षांच्या तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणीचा साड्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात हॉटेलमध्ये जेवून परतत असताना काही तरुणांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला धानोरीजवळच्या मैदानात नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली.

पीडित तरुणी युगांडाची असून ती कोंढवा परिसरात आपल्या बहिणीसोबत राहत आहे. टुरिस्ट व्हिसावर ती भारतात व्यवसाय करत होती. सोमवारी रात्री मुंढवा परिसरात जेवण केल्यानंतर ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती. मात्र त्यावेळी बाईकवरून आलेल्या एका तरुणाने तिला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले.

- Advertisement -

काही अंतरावर गेल्यानंतर बाईकस्वाराने आपल्या मित्राला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी धानोरी येथील मोकळ्या मैदानात पीडितेवर सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पीडितेने आपल्या जबाबात दिली आहे.अत्याचारानंतर पीडित महिलेला मैदानातच सोडून आरोपी पळ काढत होते. मात्र ‘मला आता किमान रस्त्यावर तरी सोडा’, अशी विनवणी तरुणीने केली. त्यावर आरोपी त्या पीडित तरुणीला दुचाकीवरून घेऊन पुन्हा रस्त्याने जाण्यास निघाले.

पण काही अंतरावर गेल्यानंतर लगेचच एका चौकात दुचाकी घसरून पडली, त्यावेळी पीडित महिलेला दोघे आरोपी रस्त्यावर सोडून निघून गेले. त्यानंतर, चौकात उभ्या असलेल्या नागरिकांनी पीडित महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणून सोडले. नंतर या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींचा शोध सुरू असल्याचे विमानतळ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -