घरमहाराष्ट्रसाताऱ्यात उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण मैदानात?

साताऱ्यात उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण मैदानात?

Subscribe

भाजपमध्ये जाण्यासाठी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा उदयनराजे भोसले यांनी दिल्यामुळे आता तिथे पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अगदी काही महिन्यांपूर्वीच २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्या उदयनराजे भोसलेंच्या खांद्याला खांदा लावून साताऱ्यात प्रचार केला, त्याच उदयनराजेंविरोधात साताऱ्यातूनच पोटनिवडणुकीत स्वत: पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साताऱ्यामध्ये पोटनिवडणूक होणार असून त्यामध्ये आता उदयनराजेंच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात असून पृथ्वीराज चव्हाण जर उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयार असतील, तर साताऱ्याची जागा काँग्रेससाठी सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी ते ही जागा लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण इच्छुक नाहीत!

साताऱ्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देखील दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी आता उदयनराजेंविरोधात कुणाला उभं करायचं? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी जागावाटपामध्ये राष्ट्रवादीच्या हातात असलेली साताऱ्याची जागा काँग्रेससाठी सोडण्याची देखील तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. मात्र, असं असलं, तरी पृथ्वीराज चव्हाण ही जागा लढवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्याची जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी कुणाला उभं करणार? यावर चर्चा होऊ लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – याअगोदरही उदयनराजे यांनी भाजपात केला होता प्रवेश!

साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच राखणार – छगन भुजबळ

दरम्यान, ‘उदयनराजे भोसले जरी भाजपकडून लढणार असले, तरी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच राखणार’, असा विश्वास पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ‘उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायला नको होतं’, असं देखील भुजबळ यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -