घरताज्या घडामोडीCoronavirus: पुण्यात सापडलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कात आले १०० जण!

Coronavirus: पुण्यात सापडलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कात आले १०० जण!

Subscribe

हा लढा करोना विषाणू विरुद्ध मावनजातीचा

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे आयुक्त दिपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यात सापडलेल्या नव्या करोना बाधिताबद्दल माहिती दिली. पुण्यात करोनाग्रस्त सापडलेला रुग्ण हा आर्यलंडवरुन आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याने ज्या टॅक्सीमधून प्रवास केला त्या टॅक्सी चालकालासुद्धा करोनाची लागण झाली असल्याची माहिती आयूक्तांनी दिली आहे. दरम्यान, आर्यलंडवरुन आलेला करोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात आला होता.


हेही वाचा – करोनाला तीन दिवसात हरवले, १०३ वर्षांच्या आजीबाईंची कमाल

या करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या जवळजवळ १०० जणांचा शोध घेतला आहे. यासह टॅक्सीचालकाला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूला सर्वांनी १०० टक्के प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • पंतप्रधानांनी काल आमच्याशी व्हीडीओ कॉनफरंसच्या माध्यमातून संवाद साधला – म्हैसकर
  • केंद्राकडून आम्हाला कशाप्रकारे मदत हवी याबाबतची कल्पना दिली – म्हैसकर
  • ब्लड बँकेसोबत चर्चा केल्या, ब्लड बँकांमधला रक्ताचा साठा कमी झाला आहे. रक्तदात्यांना बोलवले आहे. रक्तदान केलेल्यांनी ओळख दाखवावी. रक्तदान करताना गर्दी नको – म्हैसकर
  • आयटी वाल्यांनी अनावश्यक गर्दी टाळावी. आवश्यकता असेल तेवढाच कर्मचारी वर्ग ठेवा, बँका आयटी कंपन्यांना आवाहन – म्हैसकर
  • सेवा निवृत्ती डॉक्टरांसोबत चर्चा केली आहे डाटाबेस तयार केला आहे – म्हैसकर
  • गरज पडली तर सेवा निवृत्ती डॉक्टरांना बोलवणार – म्हैसकर
  • पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. हा लढा करोना विषाणू विरुद्ध मावनजातीचा. सर्वपक्षिय मतभेद दुर करुन सहकार्य करावे – म्हैसकर
  • हा लढा दिर्घकालिन आहे नेटाने लढूया – म्हैसकर
  • होम क्वारंटाईन लोकांनी घरीच थांबावे. क्वारंटाईन व्यक्तींनी कायदा तोडला तर कारवाई होणार – म्हैसकर
  • होम क्वारंटाईन केलेले लोक गुन्हेगार नाहीत, त्यांच्याकडे त्या नजरेने पाहू नये – म्हैसकर
    एकासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरले जाणार नाही – म्हैसकर

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -