घरताज्या घडामोडीकरोनाला तीन दिवसात हरवले, १०३ वर्षांच्या आजीबाईंची कमाल

करोनाला तीन दिवसात हरवले, १०३ वर्षांच्या आजीबाईंची कमाल

Subscribe

चीन, इटलीनंतर इराणमध्ये मृत्यूचे थैमान घालणाऱ्या करोनाला एका १०३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने अवघ्या तीन दिवसात हरवले आहे. या महिलेला इराणची राजधानी असलेल्या तेहरानपासून १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमनान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला दमा व उच्च रक्तादाबाचाही त्रास आहे. पण तरीही सर्व व्याधींवर मात करत महिला करोनामुक्त झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

वृद्ध व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने करोना त्यांच्यासाठी घातक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये करोनाची दहशत निर्माण झाली आहे. मात्र चीननंतर इराणमधील एका १०३ वर्षांच्या आजीबाईंनी करोनावर मात केली असून त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांना दमा व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचे कळताच कुटुंबीयांच्या पायखालची जमिनच सरकली. आजींबाईंना तात्काळ येथील सेमनान यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे वय व त्यांचा वैद्यकिय इतिहास पाहता त्या बऱ्या होतील याची खात्री डॉक्टरांना नव्हती. पण आजीबाईंनी अवघ्या तीन दिवसात करोनाला हरवत विजय मिळवला. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. याआधी केरमान येथील ९१ वर्षीय व्यक्तीही करोनामधून ठणठणीत झाल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर नविद दयानी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -