घरमहाराष्ट्रकॅनडात नोकरीच्या आमिषातून १५ लाखांची फसवणूक

कॅनडात नोकरीच्या आमिषातून १५ लाखांची फसवणूक

Subscribe

कॅनडा या देशात नोकरी व कायम रहिवासी व्हिसा देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कॅनडा या देशात नोकरी व कायम रहिवासी व्हिसा देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेकडून तिघांनी कागदपत्रे ताब्यात घेवून ठेवली होती. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाच वर्षात तीच्या पतीकडून रोख व चेकव्दारे हे पैसे त्यांनी उकळवले. या प्रकरणी शरद मधुकर वाटपाडे (वय ३५, रा.खुटवडनगर, कामटवाडे) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शरणपूर रोडवरील कॅनडा कॉर्नर परिसरातील पॅसिफिक रिलोकेशन सर्व्हिसेस येथील नितीन वसंत पाटील, माई वसंत पाटील व विजया नितीन सावळे या तिघांनी संगनमत करुन हा घोटाळा केला. शरद वाटपाडे यांच्या पत्नीला कॅनडात नोकरी व कायम रहिवास देण्याच्या बहाण्याने फेब्रुवारी २०१५ ते १८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली. वाटपाडे यांच्याकडून रोख व चेकद्वारे पाच लाख ९२ हजार ५०० रुपये घेवून पत्नीला जॉबही दिला नाही. याबाबत त्यांनी पैशांची मागणी केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच वाटपाडे यांना कॅनडा येथे जॉब करण्यासाठी हिस्ट्रीच्या नावाखाली वेळोवेळी परदेशात जॉबला जाण्यास सांगून व्हिसा, तसेच एफडीसाठी लागलेला खर्च आठ लाख रुपयांचे नुकसान केले. परदेशात असलेल्या चांगल्या पगाराच्या नोकर्‍या नितीन पाटील याच्या सांगण्यावरुन सोडल्या. यात त्यांचे २०१५ ते २०१९ पर्यंत १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, या प्रकरणी शरद वाटपाडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बंडेवाड अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधी तयार; पण सेनेकडून हवं लेखी आश्वासन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -