घरमहाराष्ट्रइगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता; पाणी पुरवठा मंत्र्यांची माहिती

इगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता; पाणी पुरवठा मंत्र्यांची माहिती

Subscribe

इगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी दिली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पाणीपुरवठा केंद्रास १९८८ मध्ये योजना कार्यान्वित झाल्यापासून आजतागायत मोठ्या स्वरूपाची कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या घसारा निधीतून उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालकांच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

शासकीय, निमशासकीय सेवेतून सेवा निवृत्त झालेल्या अभियंत्यांना आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये कंत्राटदार नोंदणी देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास लागू करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.


Maratha Reservation: आंदोलन मागे न घेता मूक आंदोलन सुरूच राहणार- संभाजीराजे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -