घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसीईटी परीक्षेत सर्व्हर डाउन झाल्याने मुलांचे भविष्य अंधारात; परीक्षाकेंद्राबाहेर गोंधळ

सीईटी परीक्षेत सर्व्हर डाउन झाल्याने मुलांचे भविष्य अंधारात; परीक्षाकेंद्राबाहेर गोंधळ

Subscribe

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरातील नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक कॉलेज या परीक्षाकेंद्रावर सीईटी परीक्षेवेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाउन झाले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी कमी अवधी मिळाला तसेच हॉल तिकीटवर अडीच तासाची वेळ होती. मात्र स्क्रिनवर दीड तासाची वेळ दाखवत होते. यासर्व अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी कमी कालावधी मिळाला व त्यातून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्यभरातून ४३१ विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षेदरम्यान आलेल्या या अडचणीमुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले होते. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्र प्रशासनाला घेराव घातल्याने कॉलेजच्या आवारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

राज्यभरात आज एमबीए प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. पंचवटीतील अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक या परीक्षाकेंद्रावर देखील ४३१ विद्यार्थ्यांची परीक्षा होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला किमान ४० ते ५० मिनिटे कमी अवधी मिळाल्याने परीक्षा संपल्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात गोंधळ घातला. विद्यार्थी तसेच त्यांचे पालक असा किमान ७०० ते ८०० लोकांचा जनसमुदाय गोंधळ घालत असल्याने कॉलेज परिसरात तानावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ त्याठिकाणी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्र प्रशासनाची बाजू समजून घेत विद्यार्थ्यांची देखील समजूत काढल्याने तनाव निवळला.  विद्यार्थ्यांनी त्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानी बाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सर्व्हर डाउनमुळे झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने परीक्षा पुन्हा घेण्यात यावी किंवा किमान गुण वाढवून देण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -