घरमहाराष्ट्रगणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सेवा, असं आहे वेळापत्रक

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सेवा, असं आहे वेळापत्रक

Subscribe

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते, त्यामुळे सर्व गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेने या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते करमळी ( LTT to Karmali) दरम्यान सुफरफास्ट साप्ताहिक वातानूकुलित विशेष गाडीची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे कोकणावासियांना मुंबईतून रात्री प्रवास करत सकाळी थेट आपल्या इच्छुक गावी पोहचता येणार आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

- Advertisement -

https://cr.indianrailways.gov.in/ https://konkanrailway.com/

https://konkanrailway.com/

- Advertisement -

असं आहे वेळापत्रक

१) एलटीटी येथून गाडी क्रमांक ०१०१५ ही प्रत्येक गुरुवारी म्हणजे २ सप्टेंबरपासून पुढील सुचना मिळेपर्यंत रात्री १२.५० वाजता सुटेल, तर करमळी येथे सकाळी १२.२० ला पोहचेल.

२) गाडी क्रमांक ०१०१६ करमळी येथून प्रत्येक गुरुवारी म्हणजे २ सप्टेंबरपासून पुढील सुचना मिळेपर्यंत दुपारी १ वाजता सुटेल. त्याचदिवशी रात्री ११.४५ वाजता एलटीटी येथे पोहचेल.

३) गाडी क्रमांक ०१०१५ एलटीटी येथून प्रत्येक गुरुवारी म्हणजे १ नोव्हेंबरपासून पुढील सुचना मिळेपर्यंत रात्री १२.५० वाजता सुटेल. तर करमळी येथे सकाळी १०.२५ वाजता पोहचेल.

४) गाडी क्रमांक ०१०१६ करमळी येथून प्रत्येक गुरुवारी म्हणजे १ नोव्हेंबरपासून पुढील सुचना मिळेपर्यंत दुपारी २.३० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री ११.४५ वाजता एलटीटीला पोहचेल.

या गाड्या ठाणे, पनवेल, चिपळून, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाडीची संरचना एक वातानुकुलीत प्रथम श्रेणी, तीन वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, १५ वातानुकुलीत तृतीय श्रेणी आणि १ पॅन्ट्री कार असणार आहे. मध्य रेल्वेने सुरु केलेल्या गाडी क्रमांक ०१०१५ आणि ०१०१६ या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असून सुपरफास्ट वातानुकुलीत आहेत. या गाड्यांच्या तिकीटाचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरु झाले आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या १८०० नागरिकांसाठी “मोदी एक्सप्रेस” धाव


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -