Saira Banu Networth:सायरा बानो यांची संपत्ती आहे 600 कोटी

सायरा बानो मुंबईतील आलीशान बंगल्यात वास्तव्य करतात त्याची किंमत 350 कोटी रुपये आहे.

saira banu birthday net worth bungalow property unknown facts
Saira Banu Networth:सायरा बानो यांची संपत्ती आहे 600 कोटी

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव स्टोरी (saira banu and dilip kumar love story)सगळ्यांनाच ठाऊक आहे. (dilip kumar and saira banu) दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या  जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत सायराजी त्यांच्या सोबत होत्या. आज सायराजी यांच्यासाठी खास दिवस आहे. आज त्यांचा 77 वा वाढदिवस साजरा करत आहे. या स्पेशल दिवसानिमित्त त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. सायराजी यांचे खरे नाव नसीम बानो आहे. त्यांनी 1966 मध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.(Saira Banu Networth)

सायरा बानो यांना अभिनयाचा वारसा लहानपणापासूनच मिळाला आहे. सायराजी यांची आई नसीब बानो 30 आणि 40 च्या दशकातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या. तसेच त्यांचे वडिल मिया एहसान उल हक खूप मोठे निर्माते होते. पण सायराजी यांच्या बालपणीच त्यांचे आई वडिल विभक्त झाले होते. यानंतर त्या लंडनमध्ये स्थायिक झाल्या. सायरा यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात 1961 साली ‘जंगली’ या सिनेमातून केली होती. तसेच त्यांनी पड़ोसन, पूरब और पश्चिम, जमीर या सारख्या हिट सिनेमात कामं केलं.(saira banu films)

कोट्यवधी संपत्तीची मालकणी आहे सायरा बानो

सायरा यांच्या नेटवर्थ बद्दल सांगायचे झाल्यास त्या तब्बल 600 कोटी संपत्तीच्या मालिकन आहे. माहितीनुसार दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांची एकूण संपत्ती 627 कोटींच्या घरात पोहोचली होती. सायरा बानो मुंबईतील आलीशान बंगल्यात वास्तव्य करतात त्याची किंमत 350 कोटी रुपये आहे.

सायरा बानो यांचं वयाच्या आठव्या वर्षी दिलीप कुमार यांच्यावर प्रेम जडले होते. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात तब्बल 22 वर्षाचे अंतर आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या कठिण काळात सुख-दु:खात त्यांना साथ दिली. दिलीप कुमार यांचं 7 जुलै रोजी निधन झाल्यानंतर सायराजी यांच्यावर दु:खाचे डोंगर कोसळले त्या म्हणाल्या,’भगवान ने मुझसे मेरे जीने की वजह छीन ली, साहब के बिना तो मैं किसी भी चीज के बारे में नहीं सोच पाऊंगी.’ यावरुनचं त्यांचे दिलीप कुमारवर किती प्रेम आहे हे दिसून येते.


हे हि वाचा – Bigg Boss OTT: शमिता शेट्टी -राकेश बापट लग्न करणार