घरमहाराष्ट्रGautami Patil : गोंदियात गौतमी पाटीलचा 'राष्ट्रवादी पुन्हा' या गाण्यावर डान्स

Gautami Patil : गोंदियात गौतमी पाटीलचा ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर डान्स

Subscribe

सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असणारी गौतमी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या कार्यक्रामाची वेगवगळे प्रयोगही करण्यात येतात. लहान मुलाच्या वाढदिवसापासून ते बैलाच्या वाढदिवसापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. मात्र तिच्या कार्यक्रमामध्ये खुर्च्यांची तोडफोड असो गदारोळ तर कुठे राडा. यामुळे ती नेहमीच चर्चेत येत असते. काल (ता.19 नोव्हेंबर) सर्वांच लक्ष भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर होत्या. याच सामन्या दरम्यान गोदियामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात खास मॅचचं स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं.

गोंदिया जिल्ह्यात गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला लावणी रसिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. गौतमीच्या कार्यक्रमात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत प्रेक्षकांनी जल्लोष केला होता. तर दुसरीकडे मोठ्या पडद्यावर भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू होता. क्रिकेटप्रेमीमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत होता. टाळ्या, शिट्ट्या वाजवत प्रेक्षक सामन्याच आनंद घेत होते.

- Advertisement -

विश्वचषकाची फायनल एकीकडे तर दुसरीकडे स्टेजवर गौतमीचा “कच कच कांदा” या गाण्यावर नाच हे दृश्य गोंदियामध्ये पाहण्यास मिळालं. क्रिकेटप्रेमींच्या नजरा विश्वचषकातल्या अंतिम सामन्यात काय होतं? त्याकडे होत्या. तर दुसरीकडे गौतमीच्या कार्यक्रमात मॅचचं खास स्ट्रिमिंग करण्यात आलं.

गोंदियामध्ये आज (ता.19 नोव्हेंबर) कार्यक्रमा बद्दल बोलता ना म्हणाली की, मला कार्यक्रम करून खूपच छान वाटलं. या कार्यक्रमामध्ये काहीही गडबड झाली नाही. आजचा कार्यक्रम खुप छान झाला. मला कायचं प्रेम मिळतं तसं आजही प्रेम मला मिळालं. गोंदियात आल्यावर खूप छान वाटले.

- Advertisement -

गोंदियामध्ये गौतमीने ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर डान्स केला. मी तीनच गाण्यांवर नाचते या आरोपात काहीच तथ्य नाही. मी तीन गाण्यांवर नाचते असं लोकांना वाटतं कारण लोक तेवढीच गाणी बघतात. असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -