घरपालघरGI rating : महाराष्ट्र उत्पादनात बहाडोली येथील जांभळाचा 'जीआय' मध्ये समावेश

GI rating : महाराष्ट्र उत्पादनात बहाडोली येथील जांभळाचा ‘जीआय’ मध्ये समावेश

Subscribe

बोईसर : कृषीसह विविध उत्पादना संबंधित भौगोलिक निर्देशांक (GI) घेण्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. आतापर्यंत मिळालेल्या एकूण 29 भौगोलिक निर्देशांकामध्ये (कृषी व बिगरकृषीसह) नुकतीच नव्याने नऊ ‘जीआय’ ची भर पडली आहे. मराठवाड्यातील कृषी उत्पादनांची संख्या अधिक असली तरी जीआयमध्ये पालघर बहाडोली जांभूळाचा जीआयमध्ये समावेश करण्यात आला आहे. (GI rating Jambull from Bahadoli in Maharashtra production is included in GI)

पालघर जिल्ह्यातील बहाडोली गावामधील जांभळांना जीआय टॅग अर्थात भौगोलिक मानांकन केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. या पेटंटसाठी कृषी विभाग गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करत होते. जांभळाला जीआय टॅग मिळाल्याने बहाडोली मधील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 29 ऑगस्ट 2022 रोजी बहाडोली येथील बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट यांचे अर्ज मान्य करण्यात आले असून जांभळाच्या दोन्ही ठिकाणी असलेली वेगवेगळी ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी व वैशिष्ट्ये विचाराधीन घेऊन त्यांना स्वतंत्रपणे मानांकन देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray SIT : आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, दिशा सालियान प्रकरणी SIT चौकशीची शक्यता

बहाडोली गावात 1875 साली बाळा जोशी यांनी जांभळाची लागवड केली होती. जांभळाची चव आवडल्याने तिथल्या शेतकऱ्यांनी बांधावर बिया लावल्या, व आज या जांभळाला वेगळी ओळख जीआयमानांकनामुळे मिळाली आहे. या जांभळाची चव ही अप्रतिम असल्याने मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सन 2004 साली तत्कालीन जिल्हाकृषी अधिकारी ठाणे यांनी गावात जांभूळ महोत्सवाचे आयोजन करून इथल्या जाभळांना राज्यामध्ये बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.

- Advertisement -

बहाडोली जांभळाची भौगोलिक मानांकनकडे वाटचाल

अनेक दशकांपासून प्रसिद्ध असणाऱ्या बहाडोली येथील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी सन 2018 पासून प्रयत्न सुरू झाले. मोठा आकार, मांसाळ व रसाळ व लहान आकाराची बी असणाऱ्या या फळाला भौगोलिक मानांकन मिळावे या दृष्टिकोनातून बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट स्थापन करून या जांभळाशी संबंधित ऐतिहासिक तसेच भौगोलिक पुरावे गोळा करण्यासाठी जगदीश पाटील यांच्या समन्वयाने प्रयत्न सुरू केले. या फळाचे रासायनिक विश्लेषण खाजगी प्रयोगशाळेतून करणे खर्चीक असल्याने कृषी विभागाने केलेल्या रासायनिक विश्लेषणाचा आधार घेण्यात आला. सूर्या व वैतरणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात गाळाची जमीन असल्याने येथील फळाला असणारे विशिष्ट चव व औषधी गुण यांचा अभ्यास करत कृषी विभागातील अधिकाऱ्यांची मदत घेऊन भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव खाजगी तज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून सादर करण्यात आला. त्याबाबत मुंबई येथे सुनावणी झाल्यानंतर बहाडोली येथील जांभळाला भौगोलिक मानांकन देण्यात आले.

हेही वाचा – Winter Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वडेट्टीवारांचा हल्ला, फडणवीसांनी सावरली सरकारची बाजू

भौगोलिक मानांकनात राज्यातील 13 अर्जांना मान्यता

देशभरातील विविध संस्था, उत्पादक संघ, शेतकरी गट, कल्याणकारी मंडळ, संवर्धन संघ आदींनी भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केले होते. या अर्जांवर देशभरात विविध ठिकाणी सुनावणी होऊन 29 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या भौगोलिक उपदर्शन प्रक्रियेत केंद्र सरकारने मान्य केलेल्या भौगोलिक मानांकन अर्जाचा तपशील प्रसिद्ध झाला आहे. या यादीत राज्यातील 13 अर्जांना मान्यता मिळाली असून ग्रामीण संस्कृती तसेच ग्रामीण भागातील संबंधित राज्यातील अनेक वस्तूंना भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढण्यास मदत

बहाडोली गावाचा भौगोलिक क्षेत्र 297.97 हेक्टर असून, खातेदार संख्या 184 आहे. या फळांचे सरासरी वजन 23.4 ग्राम असते. यामध्ये गराचे प्रमाण 87 टक्के आहे. फळाचा रंग गर्द जांभळा असून, परिपक्व फळे चार दिवसापर्यंत टिकतात. एका झाडापासून शंभर ते एकशे वीस किलो फळे मिळतात. 142 जांभूळ उत्पादन शेतकरी असून 55 हेक्टरमध्ये जांभळाची झाडे आहेत. 3 हजार 551 बाजती झाडे असून 14.85 हेक्टर क्षेत्रावर नवीन जांभळाच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे. लागवडीचे क्षेत्र वाढेल पुढे निर्यात सुद्धा होईल, हे ए प्लस ग्रेडचे फळ असल्याने त्याला दुपटीचा भाव मिळेल. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढेल, असे जिल्हा कृषी अधिकारी निलेश बागेश्वर यांनी संगितले.

हेही वाचा – Thackeray-Shinde Group: आमदार आमने-सामने; ‘मंत्रीपदा’वरून वैभव नाईकांच्या गोगावले-शिरसाटांना कोपरखळ्या

जांभूळ फळांच्या माध्यमातून दरवर्षी चार ते पाच कोटींची उलाढाल 

जांभूळ गाव बहाडोली पालघर तालुक्यात वैतरणा नदीच्या काठावर बहाडोली व इतर गावे वसलेली आहेत. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या काढणीचा व विक्रीचा हंगाम सुरू होतो. बहाडोली व इतर गावांमध्ये पाच हजारांहून अधिक जांभूळ फळझाडे आहेत. एका झाडापासून 40 ते 60 हजारांपर्यंतचे उत्पन्न जांभूळ उत्पादकांना प्राप्त होते.

कायदेशीर संरक्षण मिळण्यास यामुळे मदत

  • जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते.
  • जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनाच्या नोंदणीकृत उत्पादकांशिवाय होणार्या जी. आय. मानांकनाच्या अनाधिकृत वापरावर पायबंद घालता येतो.
  • जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते.
  • उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते.
  • जागतिक व्यापार संघटने’च्या इतर सदस्य देशांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळवण्यास यामुळे मदत होते.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी देशद्रोही ठरवलेले Nawab Malik बसले सत्ताधाऱ्यांच्या बाकावर

शेतकऱ्यांना चांगले सुगीचे दिवस येतील

बहाडोली गावातील जांभूळ फळ बागायतदार तुकाराम किणी यांनी सांगितले की, बहाडोलीतल्या जांभूळ फळाला जीआय मानांकन मिळालं ही बाब केवळ इथल्या फळबागायतदार, शेतकऱ्यांच्या हिताची, आर्थिक उन्नतीसाठी व ठोस हमीभावासाठी अतिशय चांगली बाब आहे. त्याचबरोबर पालघर जिल्हाातील शेतकऱ्यांनी लागवड केल्यास इतथ्या शेतकऱ्यांना त्यामुळे चांगली बाजारपेठ मिळून आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. इतकच नव्हे तर इतर जिल्ह्यातून उत्पन्न होणारी जांभळे बहाडोलीच्या नावाने विकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा होऊ शकतो. परंतु आता इथल्या शेतकऱ्यांना चांगले सुगीचे दिवस येतील, असा विश्वास तुकाराम किणी यांनी व्यक्त केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -