घरताज्या घडामोडीएवढ्या रात्रीपर्यंत मुली का बाहेर होत्या? बलात्कार प्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान

एवढ्या रात्रीपर्यंत मुली का बाहेर होत्या? बलात्कार प्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान

Subscribe

गोव्यातील एका समुद्र किनारी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेत एक धक्कादायक विधान केले आहे. या विधानामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधकाच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘पालकांनी त्यांची मुलं इतक्या रात्रीपर्यंत समुद्र किनारी (बीचवर) का होती? याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.’

बुधवारी सावंत यांनी सभागृहात लक्ष वेधण्यासाठी नोटिस बजावण्यावर चर्चेदरम्यान सांगितले की, ‘जेव्हा १४ वर्षांची मुलं रात्रभर समुद्र किनाऱ्यावर राहतात तेव्हा त्यांच्या पालकांनी त्याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. मुलं ऐकत नाहीत म्हणून आम्ही फक्त यासाठी सरकार आणि पोलिसांवर जबाबदारी टाकू शकत नाही.’

- Advertisement -

याप्रकरणाबाबत आता आलेल्या अपडेटनुसार याप्रकरणात चार जणांचा अटक करण्यात आली आहे. या चार आरोपींपैकी एक आरोपी सरकारी कर्मचारी असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांना बाहेर पाठवण्याची जबाबदारी पालकांनीही घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. याबाबतचे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेने केले आहे.

- Advertisement -

याप्रकरणातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘गोव्याच्या बेनालिम बीचवर दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाला. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोष मुलींना दिला. त्या रात्रभर बीचवर का होत्या?, असे त्यांनी विचारले. या प्रश्नामुळे बलात्कार करणाऱ्यांचे मनोबल वाढेल. त्यांनी हे विधान मागे घेतले पाहिजे आणि गोव्याच्या किनाऱ्यावरील सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -