घरताज्या घडामोडीCoronaVirus: गोव्यात विशेष रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द करा - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

CoronaVirus: गोव्यात विशेष रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द करा – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Subscribe

एका महिन्यापेक्षा जास्त दिवसांनंतर कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला विशेष रेल्वे गाड्यांचा मडगाव येथीला थांबा रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे गोव्यात आठ रुग्ण आढळले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत असंही म्हणाले की, विशेष गाड्या आणि विमानाने गोव्यात येणाऱ्या लोकांना गोव्याचे नसले तरी १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.

गुरुवारी सावंत यांनी सांगितलं की, १५ मे रोजी दिल्लीहून तिरुअनंतपुरमसाठी विशेष रेल्वे धावले. या गाडीला गोव्यामध्ये थांबा देऊ नये, अशी मागणी रेल्वे प्रशासनाला मागणी केली आहे.

- Advertisement -

या रेल्वेत प्रवास करणाऱ्यामध्ये ७२० लोकांनी मडगाव येथे जाण्यासाठी तिकीट बुक केली आहेत. त्यामध्ये काही जण गोव्याचे मूळ रहिवासी नसल्याचे आम्हाला समजले आहे. ते उतरल्यावर काय होईल याची आम्हाला चिंता आहे. आम्ही त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देऊ, परंतु ते तसं करतील याची आम्हाला खात्री नाही. म्हणून आम्ही हे रेल्वे स्थानक वगळण्याची मागणी करत आहोत, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

यासंदर्भात शुक्रवारी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आतापर्यंत हे रेल्वे स्थानक रद्द करण्याबाबत काही माहित नाही.

- Advertisement -

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात आठ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी सहा रुग्ण हे एकाचा कुटुंबातील असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. या सहाजणांव्यतिरिक्त एक रुग्ण हा ट्रक चालक आहे. त्याने फार जणांशी संपर्क साधला नसल्याचे समोर आले आहे. तर आठवा रुग्ण हा जहाजावर काम करणार असून तो मुंबईहून गोव्याला परतला होता.


हेही वाचा – CoronaVirus: लॉकडाऊन दरम्यान ब्युटी पार्लरमध्ये केस कापणे पडले महागात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -