घरCORONA UPDATEअपघातग्रस्त सफाई कामगारांना राजावाडी, शीव रुग्णालयात उपचार नाही; खासगी रुग्णालयात दाखल

अपघातग्रस्त सफाई कामगारांना राजावाडी, शीव रुग्णालयात उपचार नाही; खासगी रुग्णालयात दाखल

Subscribe

सुरुवातीला या दोन्ही जखमी कामगारांना राजावाडी रुग्णालयात नेले. तिथे कोविडमुळे उपचार न मिळाल्याने शीव रुग्णालयात नेले. परंतु तिथेही त्यांना जागेअभावी दाखल करून न घेतल्याने अखेर त्यांना डोंबिवलीत नेवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कुर्ला एल विभागातील यादव मंडई येथील घनकचरा विभागाच्या मोटर चौकीत काम करणारे दोन कामगार दोन दिवसांपूर्वी कामावर जात असताना दुचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.  सुरुवातीला या दोन्ही जखमी कामगारांना राजावाडी रुग्णालयात नेले. तिथे कोविडमुळे उपचार न मिळाल्याने शीव रुग्णालयात नेले. परंतु तिथेही त्यांना जागेअभावी दाखल करून न घेतल्याने अखेर त्यांना डोंबिवलीत नेवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील उपचाराचा भार कोण वाहणार असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात स्वत:च्या कामगारांवर उपचार होत नाही. तर सर्वसामान्यांचे काय अवस्था असेल हे आता समोर येवू लागले आहे.

महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग अत्यावश्यक सेवेचे एक भाग आहेत. दररोज स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा विभागाचे कामगार आणि कर्मचारी सेवेत रुजू होत आहे. कुर्ला एल विभागातील यादव मंडई येथील घनकचरा विभागाच्या मोटर चौकीत काम करणारे तुषार मुरलीधर गाडे आणि दशरथ मकवाना हे दोघे दुचाकीवरून रोजच्या प्रमाणे १३ मे २०२०  रोजी कामावर जात असताना, अचानक  दुचाकीचा मागचा टायर फुटून अपघात झाला. त्यामुळे  या दोघांच्या पायाला तसेच इतर भागाला गंभीर इजा झाली. त्यामुळे जखमी अवस्थेत त्यांना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात इथे नेले. परंतु कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार केले जात असल्यामुळे त्यांना या दोघा गंभीर रुग्णांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर बऱ्याच वेळाने येथील डॉक्टरांनी मग शीव रुग्णालयात नेण्यास सांगितले.

- Advertisement -

परंतु तेथील ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे संबंधित कामगाराला राहत्या घरी म्हणजे डोंबिवली येथे आणण्यात आले. तुषार गाडे यांच्या पायाला पूर्णपणे फॅक्चर झाले असून त्यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी आता त्यांचे ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. हे दोन्ही कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून कामाला जात होते आणि महापालिका जर आपल्याच कर्मचाऱ्यांची काळजी घेणार नसेल तर मग कामगारांनी घराबाहेर कसे पडायचे असा सवाल गाडे यांची कन्या योगिता गाडे यांनी केला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावा आणि बाबांसह इतर कामगार जे जखमी झाले आहेत त्या दोघांच्या उपचाराचा खर्च उचलावा, अशी विनंती त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -