घरदेश-विदेशकरोनामुक्त गोव्याची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी

करोनामुक्त गोव्याची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी

Subscribe

 देशात करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुढे अजून वाढवायचा की नाही यावर सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे करोनामुक्त असतानाही गोव्याने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊन ३ मेला संपणार आहे; पण राज्यातील आर्थिक व्यवहार सुरू ठेऊन लॉकडाऊनची मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली.

लॉकडाऊनची मुदत वाढवली गेली पाहिजे, असे आमचे मत आहे. लवकरच आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहीणार आहोत. राज्यात आर्थिक व्यवहार सुरू राहिले पाहिजेत. परंतु सीमा सील केल्या पाहिजेत. विमान आणि ट्रेन सेवा बंद असल्या पाहिजेत, असे सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

सध्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बाजार दूर असणार्‍या ठिकाणी दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय मॉल, दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट्स, सलून आणि स्पा इत्यादी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोवा करोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे गोवा हे देशातले पहिले करोना मुक्त राज्य आहे. गोव्यात करोनाचे सात रुग्ण आढळले होते आणि ते सातही रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता राज्यात कोणताही करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही आहे. आतापर्यंत देशात करोनाचे २८ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८८४ जण करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -