घरताज्या घडामोडीGoa Election 2022 : गोव्यात शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर प्रफुल पटेल निर्णय घेणार,...

Goa Election 2022 : गोव्यात शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर प्रफुल पटेल निर्णय घेणार, नवाब मलिकांची माहिती

Subscribe

शिवसेनेने आघाडी करण्याबाबत इच्छा दाखवली आहे. त्यावर शिवसेनेसोबत चर्चा होणार आहे. आणखी काही लोकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रफुल्ल पटेल गोव्यात घोषणा करतील असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

गोव्यात महाराष्ट्राच्या धर्तीवर महाविकास आघाडीचा प्रयोग फसला आहे. गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय महासचिव प्रफुल पटेल गोव्यात जाणार आहेत. गोव्यातील नेत्यांशी आणि शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर ते अंतिम निर्णय जाहीर करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णय झाला होता. अस्थानिक जो काही निर्णय घेईल त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती झाली आहे. त्याचप्रमाणे गोव्यात आमची इच्छा होती की काँग्रेस सोबत निवडणूक लढवावी परंतु गोव्यातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांमुळे तिकडे आघाडी होऊ शकली नाही. उद्या राष्ट्रीय महासचिव प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड गोव्याला जाणार आहेत. शिवसेनेने आघाडी करण्याबाबत इच्छा दाखवली आहे. त्यावर शिवसेनेसोबत चर्चा होणार आहे. आणखी काही लोकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रफुल पटेल गोव्यात घोषणा करतील असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

युपीमध्ये भाजपची परिस्थिती कमजोर

तसेच मणिपूरमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याचेही नवाब मलिकांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की मथुरामधून निवडणूक लढवणार परंतु आता ते अयोध्यामधून निवडणूक लढवणार आहेत. आता त्यांना आपल्याच शहरात पाठवण्यात आले आहे. योगींना गोरखपुरमध्ये उमेदवारी दिल्यामुळे भाजप कमजोर झाली असल्याचे स्पष्ट दिसतं आहे. जेव्हा एखादा नेता पराभूत होणार असे दिसते तेव्हा नेत्यांना कोणत्याही जागेवरुन उमेदवारी देण्यात येत नाही. सुरक्षित जागा शोधण्यात येते असा घणाघात नवाब मलिकांनी भाजपवर केला आहे.


हेही वाचा : Punjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली, ‘या’ दिवशी होणार मतदान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -