Double Lung Transplant : उत्तर भारतात पहिल्यांदाच कोरोना रुग्णावर डबल लंग्स ट्रान्सप्लान्ट, शस्त्रक्रिया यशस्वी

राजधानी दिल्लीमध्ये एका रूग्णालयाला जीवनदान देण्यासाठी अहमदाबादहून मदतीचा हात पुढे आला आहे. उत्तर भारतात पहिल्यांदाच रूग्णालयात एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर करत एका व्यक्तीवर डबल लंग्स ट्रान्सप्लान्ट करण्यात आलं असून त्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वीरित्या पार पडली आहे.

संपूर्ण उत्तर भारतात पहिल्यांदाच ईसीएमओच्या मदतीने एका ५५ वर्षीय रूग्णावर डबल ट्रान्सपाल्ट सर्जरी करण्यात आली आहे. मॅक्स हेल्थकेअरचे ट्रान्सप्लान्ट सर्जन, पेल्मोनोलॉजिस्ट, क्रिटिकल केयर स्पेशलिस्ट, कार्डियक एनेस्थेटिस्ट आणि डॉक्टरांची कार्डियोपल्मोनरी रिहॅब टीमने अशा अनेक शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. उत्तर भारतामधील हा पहिल्यांदाच करण्यात आलेला डबल लंग्स ट्रान्सप्लान्ट आहे. मात्र, कोरोनाची लागण झाली असून सुद्धा या रूग्णावर यशस्वीपणे शस्रक्रिया पार पडली आहे.

मेरठच्या उत्तर प्रदेशात राहणाऱ्या ५५ वर्षीय ज्ञान चंद क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिसीझचा त्रास होता. त्यांच्या फुफ्फुसात कोविड-१९ चा शिरकाव झाला होता. त्यामुळे त्याची अवस्था अधिक गंभीर झाली. त्यांना ऑक्सिजन घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला. त्यांचा जीव वाचवण्यासाठी लंग्सचं ट्रान्सप्लान्ट करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नव्हता. मॅक्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.


हेही वाचा : Test Squad: पुजारा आणि रहाणेला श्रीलंकेतील कसोटी मालिकेत संधी मिळणं कठीण ? दिग्गज खेळाडूचा खुलासा..