घरमहाराष्ट्रपुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५३ लाख रुपायांची सोन्याची बिस्किटे जप्त

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५३ लाख रुपायांची सोन्याची बिस्किटे जप्त

Subscribe

या सोन्याच्या बिस्किटांचे वजन १६३३ ग्रॅम आहे.

कस्टम डिपार्टमेंटने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे प्रसाधनगृहातून ५३ लाख रुपायांची सोन्याची १४ बिस्किटे जप्त केली आहेत. केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, ‘दुबईवरुन पुण्याला येणाऱ्या स्पाइस जेट या विमानातील प्रवाशाने सोन्याची १४ बिस्किटे आणली असण्याची शक्यता आहे’. रविवारी पहाटे स्पाइस जेट हे विमान दुबईहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. कस्टम्स डिपार्टमेंटने सर्व विमान आणि प्रवाशांची तपासणी केली. कस्टम डिपार्टमेंटला दुबईवर येणाऱ्या विमानातून सोने आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्या तपासादरम्यान कुठेही सोने आढळले नाही.

पिशवीत सापडली सोन्याची बिस्किटे

त्यानंतर कस्टम डिपार्टमेंटने पूर्ण विमानतळाची तपासणी केली. त्यादरम्यान त्यांना विमानतळावरील प्रसाधनगृहातील वॉश बेसिनच्या खाली एक प्लास्टिकची पिशवी चिटकवलेली आढळली. तेव्हा त्या पिशवीमध्ये सोन्याची १४ बिस्किटे सापडली. त्या सोन्याच्या बिस्किटांचे वजन १६३३ ग्रॅम आहे. या सर्व सोन्याच्या बिस्किटांची किंमत ५३ लाख रुपये आहे. विमानतळावरुन बाहेर जाताना प्रवाशाला आपण पकडले जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याने सोने प्रसाधनगृहात लपवून ठेवल्याचा संशय आहे. या अगोदर २८ मे ला सुरतमध्ये कस्टम डिपार्टमेंटने एका माणसाला सौदी अरेबियामधून ९६ ग्रॅम सोन्याची तस्करी करताना पकडले होते.

- Advertisement -

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या तस्करी प्रकरणाची कारवाई कस्टमचे उपायुक्त महेश पाटील, अधीक्षक सुधांशु खैरे, माधव पळणीटकर, विनिता पुसदेकर, निरीक्षक बाळासाहेब हगवणे, घनश्याम जोशी, अश्विनी देशमुख, जयकुमार रामचंद्रन, संदीप भंडारी, ए. एस. पवळे यांनी केली आहे. या प्रवाशाविरोधात भारतीय कस्टम कायदा १९६२ नुसार तस्करी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -