घरताज्या घडामोडीसोने - चांदी दरात घसरण, करोनाचा कहर सुरूच

सोने – चांदी दरात घसरण, करोनाचा कहर सुरूच

Subscribe

आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण पहायला मिळाली. सोन्याची किंमत आज १५७ रूपयांनी कमी झाली. त्यामुळे आजचा सोन्याचा प्रत्येक १० ग्रॅम साठीची किंमत ही ४४ हजार २५० रूपये इतकी होती. पण सोन्याच्या मागणीत आजही तेजी पहायला मिळाली आहे. याआधी सोन्याला ४४ हजार ४०७ रूपये प्रति १० ग्रॅम असा भाव मिळाला होता.

आज चांदीच्या किंमतीतही घसरण पहायला मिळाली आहे. चांदीच्या किंमतीत ९९ रूपयांची घसरण प्रत्येक किलोमागे पहायला मिळाली आहे. चांदीचे दर ४७ हजार ६१६ रूपयांवरून ४७ हजार ५१७ रूपयांवर खाली आली आले. दिवसभरात अनेकदा सोन्याच्या दरांमध्ये चढ उतार पहायला मिळाली. आजही भारतीय रूपयाची अमेरिकन डॉलरच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली. आजही रूपया ५ पैशांनी आणखी घसरला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया आज ७३.४४ रूपयापर्यंत खाली आला. जगभरात करोना व्हायरसचे संकट असल्यामुळे रूपयाच्या किंमतीतही सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत मात्र सोन्याला वाढीव किंमत मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -