घरमहाराष्ट्रगुगलने बाबा आमटेंना वाहिली आदरांजली

गुगलने बाबा आमटेंना वाहिली आदरांजली

Subscribe

आज ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती आहे. या जयंती दिनानिमित्ताने गूगलने डूडलमार्फत बाबा आमटे यांना आदरांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गुगलने डूडलमार्फत आदरांजली वाहिली आहे. आज बाबा आमटे यांची १०४वी जयंती आहे. बाबा आमटे यांचा जन्म स्वांतत्र्यपूर्व काळात २६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे झाला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सोशित, वंचित समाज आणि कृष्ठरोग्यांसाठी अर्पण केले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, गांधी पिस प्राईज अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जयंती दिनानिमित्ताने गुगलने खास डूडलमार्फत त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम केले आहे. या डूडलमध्ये गुगलने काही फोटो टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बाबा आमटे यांचे खरे नाव डॉ. मुरलीधर देवीदास आमटे असे आहे. बाबा आमटे यांचे समाज कार्यातील योगदान फार मोठे आहे. भारतीय समाजामध्ये कृष्ठरोगाविषयी चुकीचे संभ्रम आहेत. त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला कृष्ठरोगाची लागण झाली तर त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नसे. अशा रोग्यांना उपेक्षित वागणूक दिली जाई. कृष्ठरोगाची लागण झाल्यामुळे घरच्यांनी पाठ फिरवलेल्या अशा शेकडो कृष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे खऱ्या अर्थाने देवदूत ठरले. कृष्ठरोग्यांच्या भकास आणि दु:खी आयुष्यात आनंद निर्माण व्हावा यासाठी बाबांनी १९५० साली चंद्रपूर येथे ‘आनंदवनाची’ स्थापना केली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कृष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद भरण्यात वेचले. त्यांच्या याच समाजकार्याचा वारसा त्यांचे दोन्ही मुले प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांनी जबाबदारीने हाती घेतला. काही दिवसांपूर्वी प्रकाश आमटे यांच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट देखील प्रदर्शित झाला.

- Advertisement -

समाजकार्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांना माय महानगरकडून भावपूर्ण आंदराजली!


हेही वाचा – गुगल डूडलवर दिलीप सरदेसाईंना मानवंदना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -