घरमहाराष्ट्रबीडमध्ये माकडांने माजवला उच्छाद,तब्बल 250 कुत्र्यांची केली हत्या,नेमकं काय घडलं ?

बीडमध्ये माकडांने माजवला उच्छाद,तब्बल 250 कुत्र्यांची केली हत्या,नेमकं काय घडलं ?

Subscribe

माणसांमध्ये राग , प्रेम , लोभ , द्वेष यासारख्या भावना असतात वेळोवेळी या भावनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती व्यक्त होत असतो किंवा आपल्या भावनांचे प्रकटीकरण करत असतो असं म्हणायला हरकत नाही.दरम्यान,मानवाचे पूर्वज माकड असून याच्यापासूनच आजच्या माणसाची उत्पत्ती झाली आहे. यामुळे माणसाच्या स्वभावाशी वागणूकीशी निगडीत अनेक गोष्टीसारखे साम्य माकडांमध्ये देखील आढळते. ज्याप्रमाणे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एक आई  हिंसक होत असते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात देखील संतप्त माकडांची टोळी पेटून उठली आहे. या माकडांच्या टोळीने तब्बल 250 कुत्र्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव भागात घडली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार संतप्त माकडांची टोळी ही गावातील सर्व कुत्र्यांवर हल्ला करत आहेत. ही सर्व माकड कुत्र्यांना एखाद्या उंच झाडावर किंवा इमारतीच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून कुत्र्याला खाली फेकून देतात. माकडांच्या या उद्रेकानंतर स्थानिक नागरिकांनी ही माहीती वनविभागाल दिली तसेच परिसरात हाहाकार माजवलेल्या या माकडांना पकडण्याची मागणी केलीये.

- Advertisement -

माकड कुत्र्यांना का मारत आहेत ?

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात असणाऱ्या कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारलं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरूवात केली. माकडांने सुड घेण्यासाठी या माजलगाव येथील कुत्र्यांवर बारीक लक्ष ठेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली. हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू असून माकडांने माजवलेल्या या उच्छादाने परिसरात एकही कुत्रा आता दिसेनासा झाला आहे. या काळात माकडांनी तब्बल 250 कुत्र्यांचा जीव घेतला आहे तसेच वनविभाग पथकाच्या हातातून ही माकडांची टोळी निसटत आहे, त्यांना एकही माकडाला पकडण्यात यश आलं नाहीये.


हे हि वाचा – ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिकेच्या नव्या गाइडलाइन्स जारी, न्यू ईयर पार्टीवर राहणार वॉच

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -