घरमहाराष्ट्रपुण्यात सापडला हॅण्डग्रेनाईड बॉम्ब!

पुण्यात सापडला हॅण्डग्रेनाईड बॉम्ब!

Subscribe

ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनाईड सदुश्‍य वस्तू सापडली. पालिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने स्फोट घडवून ती नष्ट केली. पुढील तपासणी करीता काही तुकडे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या मुख्य कार्यालयाजवळ हे हॅण्डग्रेनाईड आढळून आले. हा प्रकार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका सफाई कामगाराच्या लक्षात आला. मुख्य कार्यालयाशेजारी पुणे रेल्वे स्थानकाच्या आत जाण्यासाठी पादचारी पुल आहे. या पुलालगत पार्कींगच्या मागील रस्त्यावर हा कर्मचारी साफ सफाईचे काम करीत होता. त्याने हॅण्डग्रेनाईड सदुश्‍य वस्तू आढळल्याची माहीती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय संतोष बडे आणि हेड कॉन्स्टेबल विकास पाटील माहीती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर श्‍वान पथक आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली गेली.
बंडगार्डन पोलीसांपाठोपाठ बीडीडीएस पथक तेथे पोहचले. याभागाची नाकाबंदी करून हॅण्डग्रेनेड सारख्या वस्तुची पाहणी केली. नंतर ही वस्तु रेल्वेच्या रिकाम्या मैदानात नेण्यात आली. तेथे ही वस्तू चारच्या सुमारास स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. यानंतर त्याचे अंश गोळा करुन पुढील तपासणीसाठी नेण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे आदी दाखल झाले होते. याप्रकाराबाबत लष्कराला माहीती कळविण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -