घरमुंबईदिवाळीत जप्त केली २६ लाखांची मिठाई; एफडीएची कारवाई

दिवाळीत जप्त केली २६ लाखांची मिठाई; एफडीएची कारवाई

Subscribe

कमी दर्जाच्या अन्न पदार्थांचा अहवाल आल्यास संबंधित न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल होऊन दंडात्मक कारवाई

सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच काळात भेसळ करणाऱ्यांचंही फावतं. या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. याच पार्श्वभूमीवर, राज्याच्या अन्न आमि औषध प्रशासनाकडून अन्न तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील विविध विभागातून एफडीएने मिठाई, खवा, मावा, तेल, वनस्पती घी आणि इतर अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. यंदा हे काम अन्न आणि सुरक्षा मानकं प्राधिकरणाकडे सोपवण्यात आलं होतं. एफडीएने दिवाळीकाळात जवळपास २६ लाखांचा माल जप्त केला असून या अन्न पदार्थांचा अंतिम अहवाल अजून प्रलंबित आहे. कमी दर्जाचे आणि अस्वच्छ परिसरात तयार केले जाणाऱ्या पदार्थांमुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी दिवाळी किंवा कोणत्याही सणात गोडाचे अन्न पदार्थ खाताना काळजी घेणं गरजेचं आहे.

भेसळयुक्त पदार्थाच्या नावाखाली ७४४ नमुने जप्त

एफडीएतून मिळालेल्या माहितीनुसार, मावा आणि खवाचा १९५७ किलो माल तसेच २९८२ किलो मिठाई जप्त करण्यात आली असून याची किंमत ४ लाख ८८ हजार ६७० रुपये आहे. तर संशयित आढळून आलेल्या ३८५ मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय वनस्पती तूप, तेल, तुपाचा २० हजार ५० किलो माल जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ११ लाख २३ हजार ८६ रुपये आहे. तर, अन्य अन्नपदार्थांमध्ये १४५८ किलोचा माल जप्त करण्यात आला आहे. याची किंमत सहा लाख ८७ हजार ६८ रुपये आहे. याशिवाय भेसळयुक्त पदार्थ असल्याच्या संशयावरून ७४४ अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत.

” दिवाळीच्या सणात आकर्षक दिसणाऱ्या मिठाईची मागणी प्रचंड वाढते. यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भेसळयुक्त मिठाई शोधण्यासाठी मोहिम सुरू केली होती. मात्र हे काम अन्न सुरक्षा मानद प्राधिकरणाकडे सोपवलं होतं. त्यानुसार मुंबईसह राज्यभरातून 26 लाख रूपयांची भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली आहे. ”

शशिकांत केकरे, सह-आयुक्त , एफडीए (अन्न) विभाग

- Advertisement -

असुरक्षित अन्न पदार्थ आढळल्यास खटला दाखल

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या विविध विभागात केलेल्या कारवाईदरम्यानचे अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. अन्न पदार्थांचा अहवाल प्रलंबित असून तो यायचा आहे. अन्न पदार्थांच्या नमुन्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर कमी दर्जाचे किंवा असुरक्षित अन्न पदार्थ आढळून येतील. असुरक्षित अन्न पदार्थ आढळल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाईल. कमी दर्जाच्या अन्न पदार्थांचा अहवाल आल्यास संबंधित न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल होऊन दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे न्यायनिर्णय अधिकारी तथा सह आयुक्त, अन्न (बृहन्मुंबई) शशीकांत केकरे यांनी दिली.


वाकडेतिकड्या दातांमुळे पत्नीला दिला ट्रिपल तलाक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -