घरमहाराष्ट्रअजित दादांनी दिल्या शिवसेनेला ५४ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

अजित दादांनी दिल्या शिवसेनेला ५४ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

Subscribe

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचे महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज मतदान; अनेक दिग्गज रिंगणात


तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२.३० वाजता झुम अॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिवाय, शिवसेना नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख यासह पदाधिकाऱ्यांसह संवाद देखील साधणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -