घरताज्या घडामोडी10वी-12वीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 250 विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र सेवा संघातर्फे सन्मान

10वी-12वीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 250 विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र सेवा संघातर्फे सन्मान

Subscribe

मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे दरवर्षी प्रमाणे दहावी-बारावीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 250 विद्यार्थ्यांचा सत्कार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. सलग 24 वर्षे अशा प्रकारचे गुणगौरव करुन ही संस्था विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आहे.

मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे दरवर्षी प्रमाणे दहावी-बारावीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 250 विद्यार्थ्यांचा सत्कार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. सलग 24 वर्षे अशा प्रकारचे गुणगौरव करुन ही संस्था विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आहे. चांगले गुण मिळाल्यावर असा सत्कार झाला तर विद्यार्थ्यांना आणखी नवे बळ मिळते, असे प्रतिपादन आमदार अँड आशिष शेलार यांनी यावेळी केले. (Maharashtra Seva Sangh felicitates 250 students who scored more than 90 percent marks in 10th and 12th)

माझी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी गुणगौरव समारंभ मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये संपन्न झाला. विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे यंदाचा हे 24 वर्ष आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तब्बल 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले 250 पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच, त्यांच्या पालकांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि एक आकर्षक बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी आणि मुलुंड सेवा संघाद्वारे आयोजित या कार्यक्रमांमध्ये मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अँड आशिष शेलार,, ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटीचां या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित केलं. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशा पद्धतीने सज्ज व्हावे यासाठी समुपदेशक कविता रेडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समुपदेशन केलं.

- Advertisement -

नेमकी कुठल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने आपलं लक्ष गाठण्यासाठी करिअरच्या वाटा निवडाव्यात यासाठीच समुपदेशन यावेळी करण्यात आलं. अँड आशिष शेलार यांनी देखील परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचा गुणगौरव करता आला नाही परंतु यावर्षी ही कसर भरून काढत गेल्या दोन वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला हा सत्कार विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल अशी आशा यावेळी या समारंभाचे आयोजक प्रकाश गंगाधरे यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील या गुणगौसमारंभाला उपस्थिती लावली होती आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं.


हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -