घरमहाराष्ट्रपत्राचाळ प्रकरण: संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी

पत्राचाळ प्रकरण: संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी

Subscribe

मुंबई – खासदार संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावर सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाती विशेष पीएमएलए कोर्टात आज संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे संजय राऊतांना कोर्टात पोहचण्यास उशिर झाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊतांना दीड तास उशिरा हजर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबर तारीख देण्यात आली होती. कोर्टाने राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचीही नोंद घेतली आहे.

- Advertisement -

14 दिवस कोठडीत वाढ –

19 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली. यानंतर संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

गोरेगावमधील कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला आहे. संजय राऊतांवर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची गेल्या सुनावणीत न्यायालयाने दखल घेतली होती. मात्र, आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असे संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर प्रत देऊ असे ईडीनं सांगितले. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊतांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचे कोर्टाने म्हटले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -