घरमहाराष्ट्रपुढील दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

देशात ऑक्टोबर महिना सुरु झाल्यावर उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. यंदा मात्र उन्हाचे चटके बसायला अद्याप सुरुवात झालेली नाही. गेले चार महिने धुमाकूळ घालणारा पाऊस ऑक्टोबरमध्ये देखील बरसतो आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले १५ दिवस मोसमी पावसाचा रखडलेला प्रवास तीन दिवसांपूर्वी सुरु झाला.

येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून पाऊस माघारी परतणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं देखील हवामान विभागाने सांगितलं आहे. आतापर्यंत मोसमी वारे देशातून माघारी फिरणं अपेक्षित होतं. परंतु, कमी दाबाच्या पट्यांमुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस माघारी परतेल. मात्र, दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, २५ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २६ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय, राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल.

- Advertisement -

हेही वाचा – लसीचं राजकारण करण्याएवढ्या कोत्या मनोवृत्तीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -