घरमहाराष्ट्रलसीचं राजकारण करण्याएवढ्या कोत्या मनोवृत्तीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत - संजय राऊत

लसीचं राजकारण करण्याएवढ्या कोत्या मनोवृत्तीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत – संजय राऊत

Subscribe

केवळ राजकारणासाठी, निवडणुकांसाठी लसीचं राजकारण करण्याएवढ्या कोत्या मनोवृत्तीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचली पाहिजे. हा विषय एखाद्या राज्याचा नाही. आम्ही या विषयाकडे संपूर्ण देश म्हणून पाहतो, असं संजय राऊत म्हणाले.

राज्याचे अल्पसंख्याक आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस देईल, अशी घोषणा केली. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. “नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी घोषणा केली आहे. मला असं वाटतंय की नक्कीच त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, आरोग्यमंत्र्यांशीचर्चा केली असणार. आम्हाला सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचली पाहिजे. हा विषय एखाद्या राज्याचा नाही. आम्ही या विषयाकडे संपूर्ण देश म्हणून पाहतो. पण राज्याचं नेतृत्व शिवसेनेकडे असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्राचीही काळजी आहे. पण फक्त निवडणुका आहेत, राजकारण आहे, म्हणून लसीचं राजकारण करावं इतक्या कोत्या मनोवृत्तीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -