घरमहाराष्ट्रपुण्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर; रस्ते पाण्याखाली

पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर; रस्ते पाण्याखाली

Subscribe

पुण्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने हाहाकार केला असून अनेक ठिकाणी साचल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून पाऊसाची बॅटिंग सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यात देशासह राज्यभरात होणारा हा परतीचा पाऊस रौद्र रूप धारण करताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाही पावसाचा परतीचा प्रवास अद्यापही सुरु झालेला दिसत नाही. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने पुणे शहरांत पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा पुणे शहर पाण्याखाली गेले आहे. पुण्यातील लोहगाव, कात्रज आणि येरवडा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे पुणेकर मात्र, सध्या खूपच त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

सोसायट्यांमध्ये शिरले पाणी

पुण्यातील लोहगाव येथील अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या ठिकाणांची अनेक वाहन ही पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, सोमवारी, रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात आज पहाटेच्या सुमारास पाणी साचू लागले. साधारण चार फुटांपर्यंत रस्त्यांवर पाणी साचल्याचे आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. पण रात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा पाणीच पाणी झालेले पाहायला मिळत आहे.

बस अडकल्याची घटना

सोमवारी, पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोहगाव येथे सखल भागात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात एक खासगी बस अडकल्याची घटना घडली होती. मात्र, वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पुन्हा एकदा रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणेकर देखील हतबल झाले आहेत. अनेक इमारतींमधील पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बऱ्याच गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात मुसळधार पाऊस, झाड पडून एक जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -